Tuesday, May 31, 2016

Er Rational musings #539

Er Rational musings #539



या कथानकातिल सर्व पात्रे काल्पनिक असून, त्यांचा वास्तविक जीवनाशी अथवा जीवंत वा मृत व्यक्तीशी काही साधर्म्य आढ़ळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.



"अरे, यह तो बेहतरीन हैं।"



एक मायनाँरिटी इंजिनियरिंग काँलेज. अक्षरशः हातांच्या बोटांवर मोजण्या एवढेच मराठी स्टूडंट्स. लास्ट ईयर चा एक स्टूडंट्स ग्रूप, 'इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स' व 'सिव्हील इंजिनियरिंग' वाल्यांचा, सात च जणं. सगळे मराठी. आणि 'करू'. धतींगबाज.



त्या वर्षी, स्टूडंट्स काउन्सिल ची निवडणूक लढवून, कल्चरल सेक्रेटरी पद पटकावले यातल्या एकाने; ठरवून सगळ्यांनी, झोल झाल करून! तसल्या काँलेजच्या इतिहासात प्रथमच. मग अँन्यूअल गेेट टूगेदर च्या तयारीचा प्रसंग.



प्रत्येकाला स्नँक्स बाँक्स द्यायचे ठरले, मँनेजमेंटच्या मिटींग मध्ये. त्यातल्या स्वीट ची जबाबदारी ह्या पठ्याने उचलली, नव्हे मिळवलीच. केकचा तुकडा द्यायचे ठरले. जवळपास 1100 मुलांसाठीची आँर्डर.



मग मिटींग 'बसली'; 'सेटींग' बाबत साधक बाधक चर्चा करायला, अँक्राँस द टेबल; (मँनेजमेंटची नव्हे, या सात जणांची!)



दादर च्या एका ओळखीच्या दूकानदाराला गाठून, त्याला समजावून, दोन निराळे केक चे सँपल्स घेवून, सिलेक्शन साठी, मँनेजमेंटच्या मिटींग मध्ये सादर करण्यात आले. सँपल्स चाखले सगळ्यांनी, पहिल्या केकचे



~ सर, ये हैं पर पीस 6 रूपया. 6600 हो जायेगा, लेकिन हमने पटाकर 6500 में उसको अँग्री करवाया हैं.

~ बढीया हैं, बहुत खुब।



मग दूसरं सँपल, सादर (read serve) केलं गेलं.



~ सर, अौर ये दूसरा, प्युअर घी जैसा, झमझम जैसा, क्रीम भी लगाके हैं; लेकीन ये गिरेगा 9 रूपया, पर 9900 के जगह,  हमनें उसको पटाया हैं सिर्फ 9500 में, सर!

~ अरे, यह तो बेहतरीन हैं।"



सगळ्यांनी बोटं चोखत, मिटक्या मारत, ह्या दूसऱ्या प्रस्तावाला एकमताने सहमती दिली!



छानपैकी काँलेज गँदरींग पार पडले.



ही गँग कुठाय शेवटच्या दिवशी?



भायखळ्याच्या कबाना मघ्ये पँटीस खावून, दोन टँक्स्या करून, दिल्ली दरबार ची (फाँकलंड रोड वालं ते खरं, कुलाब्याचे नव्हे - ते कुलाब्याचे 'मोठ्याचे'!) बिर्याणी खायला रवाना. तेव्हा, अठ्ठवीस तीस वर्षांपूर्वी, त्यांच्यासाठी हे जीवाच्या मुंबई पेक्षा कमी नव्हतं!!



च्यायला फूकटे, बिलंदर, हरामखोर! पैसे आले कुठनं?



वर, यांची आपसांत खमंग चर्चा:



ये तो बेहतरीन हैं, म्हणे!!

ख्या ख्या ख्या.



इटस् आँल अबाऊट पर्सेप्शन, पर्सुईसिव्ह स्कील व सगळ्यांत महत्वाचे प्रेझेंटेशन! विथ पोकर फेसड् आँफ कोर्स!!



दोन्ही केकच्या तुकड्यांची खरी किंमत 5 रूपयेच होती. तो रेट त्यांनी घासावीस करून 4 रूपयावर आणला! पहिल्याचं पँकींग साध सुध करून नेलं होत, व दूसरा (किंमत सेमच होती!!) जरा सजवून, वेगळ्या शेपचा रंगीत चांगल्या वेष्टनातन् खिलवलावता. 5100 रूपये निव्वळ नफा (!)



तूम्हीच ठरवा. तेव्हा 'मिळवलेले' एव्ह्हढे पैसे हे खूप होते, सगळ्यांना पुरून उरले की ओ!



सूज्ञांस अति सांगणे न लगे...

---

मिलिन्न्द काळे, 31st May 2016

No comments:

Post a Comment