Friday, May 27, 2016

Er Rational musings #529

Er Rational musings #529



यह बहुत ना-इन्साफी हैं.



स्त्री पुरूषाच्या पेहेरावात साम्यता का नाही?



लैंगिक उद्दिपीत करणारे अवयव झाकण्याच्या अपरिहार्हतेमुळे वा कंपल्शन मुळे कदाचित हा फरक पडत गेला असावा. आदिम कालापासून, दोघांच्या कमरेखालचा भाग व अँडिशनली स्त्री ची वक्षस्थळे, यामुळेच की काय, वस्त्रात लपेटायची सुरूवात झाली असावी, असे वाटते.



परंतु कालानुरूप, आपला देश असो वा पाश्चात्य देश, स्त्री च्या कपड्यांच्या बाबतीत एव्हढी वैविध्यता आलीये की बस्स!



कंचुकी, चनीया चोली, ते परकर पोलकं, स्कर्ट, फ्राँक, ते घागरा चोली, चूड़ीदार, ते लेगीन्स, सलवार कमीज, जीन्स, ते काप्री, थ्री फोर्थ, ते शाँर्टस्, शर्ट पँट, ते स्लिव्हलेस, मँक्सी, अनारकली, ते...लुगडी, सहा वार, नऊ वार, साड्या (शंभर एक प्रकार असावेत), ते, अगदी काहिही! [अजून खूप आहेत असावेत हे प्रकार, पण जागेअभावी, इथे नाही दिले, क्षमा असावी.]



अतिशयोक्ति सोडा, पण जरा मुला-पुरूषांबरोबर कंपेअर करूया.



शर्ट पँट, बास्स. (व त्याचेच उपप्रकार, जसं टी शर्ट इ). हाँ आता, धोतर, सफारी (!) सूट, कोट, शेरवानी इ आहेत, पण इसेंशियली, ओन्ली काय तर, शर्ट आणि पँट!!



 बरं, त्यातही, या समस्त नारी जाती साठी फूलं बिलं, नाजूक साजूक प्रिंट, गुलाबी हिरवा पिवळा इ नानाविध रंगसंगती च्या कापडांची चलती.



याविरूध्द आम्ही आहोतच, तसे, ब्लँक अँड व्हाईट, तुलनेनी! एखाद्या लाईट कलर चा शर्ट, डार्क कलरच्या प्यांटीत खोचून बिचून, पट्टा गुंफून तय्यार! (इंसिडंटली, या कमरपट्याची तशी काही गरज नसते, पँट काही खाली बिली घसरत नाही, पण उग्गीच आपली पध्दत पडलीये!). संपलं. असो.



पण, हेच तर आहे ना ब्लेसिंग इन डिस्गाईज!



मुळातच स्त्रीयांना गबाळेपणाचा तिटकारा असतो; त्यातनं हे असले छान छान अनेकविध आँप्शन्स.



'बघताना' फ्रेश बरं वाटतं...

---

मिलिंद काळे, 27th May 2016

No comments:

Post a Comment