Er Rational musings #490
काही जेन्यूईन भाबडे प्रश्न...
~ पोलिसी भाषेत माणसाला 'इसम' का म्हणतात?
~ साधं असो वा थ्री स्टार; हाँटेल मध्ये थोडे (से) तोकडे (च) टाँवेल का असतात? की जे नीट पूर्णपणे अंगाला गुंडाळता येत नाहीत? बर, त्या साबणाच्या वड्या मोस्टली मेडीमिक्स (च) का असतात?
~ 'TTMM' म्हणजे 'तूझे तू माझे मी' या अँरेंजमेंटला 'सोल्जर्स काँट्रिब्यूशन' असं का म्हणतात?
~ सरकारी लाँग लीज नव्याणव (च) वर्षांचे (च) का असते? बरं, आणि ते एक रूपया 'नाममात्र' भाडे वगैरे!
~ हे इक्वल स्ट्रीट्स वगैरे उद्योग उपक्रम, मूंबई च्या वेस्टर्न (च), म्हणजे बँड्रा (वाद्रे किंवा बांद्रा नव्हे), पाली हिल, खार, लिंकींग रोड इ परिसरात (च) का चालतात? राबवले जातात?
~ मुंबई च्या बाहेर बाईकस्वार आरसे काढून का ठेवतात? आरश्यांशिवाय गाड्या का रपेटतात?
~ आणिक, कर्नाटकातले बहुतांश डांबरी रस्त्यांवर, हेवी - लो ट्रँफीक बहुतांश सेमसेम असताना, खड्डे का पडलेले दिसत नाहीत, कंपेअर्ड टू मूंबई...
---
मिलिंद काळे, 9th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment