Sunday, May 22, 2016

Er Rational musings #516

Er Rational musings #516



"देखो मैंने देखा हैं ये एक सपना, फूलोंके शहर में हो घर अपना...



सिनेमा म्हणजे अर्थातच, ग्रेट सिनर्जी आँफ

कथा, पटकथा, संवाट, दिग्दर्शन, कलाकार, संगीत, गीते, गायक, सिनेमँटोग्राफी, संकलन, कला दिग्दर्शन (हल्लीचा प्राँडक्शन डिझायनर!), छायाचित्रण इत्यादि शिवाय काँस्च्यूम्स, लोकेशन, रंगभूषा, आणि आता सगळ्यांना पुरून उरलेलं ते न्यूमरोे ऊनो यत्र-तत्र-सर्वत्र मात्र मार्केटिंग तंत्र!!



सैराट ची कथा, तशी सरधोपट, म्हणजे आंतरजातीय अल्पवयीन प्रेम, कन्व्हर्टेड टू घरच्यांचा विरोध, व्हायोलन्स, मग इलोपींग, कल्मिनेटिंग इनटू खडतर प्रवास, अडचणी, मार्ग, विवाह, दृष्ट लागोजा सूखी संसार, संसारवेली वरचं फूल आणि, द्वेष - आँनर किलींग!



हे आजही धगधगतं दाहक वास्तव आहे. ग्रामीण भागांत खाप पंचायती सदृश/धार्जीणी वृत्ती सो काँल्ड अप्पर लोअर कास्ट नातेसंबंधांत आहे. शहरी भाग पण फारसा नामानिराळा नाहीये; आँनर (!) किलींग म्हणे, माय फूट!



सैराट हा चित्रपट ही कथा 'दाखवतो', पण 'व्यथा' मांडताना कमी पडतो.



घडतय ते पडद्यावर बघत, आपण एंजॉय करायचा मनापासून प्रयत्न करतो, पण, साँरी टू से, प्रश्नचिह्न पडतच राहतात.



कथा हा कुठल्याही चित्रपटरूपी पतंगाचा मांजा असतो. धारधार, नानाविध (दीड वीत, दोन वीत इ) कण्यांमध्ये बांधलेला, आवडनावड असलेल्या/पाडलेल्या चार भोकांतून गुंफत, गाठी मारलेल्या मांजाने (रीड कथेने) हा पतंग बदवायचा असतो; पटकथा/संवाद रूपी रिळेने ढील द्यायची असते, पतंग हेंदकाळवयाचा असतो, बाजूला - क्षणात खाली, क्षणांत उंच नेत नेत, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचे असते. कथा गाभा आहे यार, आत्मा असतो तो चित्रपटाचा!!



इथेच माशी शिंकलीये. पटणेबल पाहीजे बाबा सगळं!!



सैराट मधलं बिटरगाव; इथे समुद्र वजा नदी आहे (जी वळसा घालून, बाय रोड पण अल्मोस्ट तितक्याच वेळेत पार करता येते, जितक्या वेळेत नाव/होडी वा चक्क मोटरबोट! ही मोटरबोट बहुतकरून अनमँन्ड ठेवलेली असते, इंधन बिंधन भरून!), (बहुतेक) एकच विहीर आहे, जी को-एड आहे (को एज्यूकेशन म्हणजे मुलं मुली एकत्र), एक रेल्वे लाईन आहे, एक एसटी स्टँड आहे, ऊस आहे तिथेच नारळी ही आहे, (बहुधा) एक च छान स काँलेज ही आहे. इथे सतरा अठरा वर्षांचे स्टूडंट्स एफवाय ला आहेत. त्यात प्रशांत काळे नावाचा दररोज नवीन कापडं घालणारा, कवी नायक आहे, ट्रँक्टर बुलेट चालवणारी अर्चना पाटील नामक आय लव्ह यू म्हणणारी नायिका आहे. सग्गळ सगळं आपापल्या जागी 'फिट्ट प्लेस' केल्यावर समोर येते ती अनेक न पटणाऱ्या अवास्तव प्रसंग गोष्टी घेवून मारून मुटकून भट्टी बनवलेली एक परिकथा.



लव्ह अँट फर्स्ट साईट म्हणतात. पण अर्चीला परशा कोण हे वर्गातल्या इंट्रोडक्शन पूर्वी माहीत नसतं. त्याला मात्र ती आवडत असते, कधीपासून माहीत नाही. ती लहानाची मोठी बिटरगावात झालेली असते का? माहीत नाही. डायरेक्ट चपला पायात घालून विहीरीत उडी मारतो परशा, आधी नदी बिदी पार करून वगैरे. अर्चीने झापल्यावर, चपलांसहीत विहीरीतून चालत बाहेर. सुरूवातीची क्रिकेट मँच, व्यंगावर इनोद हमखास गल्लाभरू असल्यामुळे प्रदीपची छोट्टी जोडीशी प्रेमकथा, मंग्याचं धमकावणं वगैरे प्रसंग सतत शेवटपर्यंत खटकत राहतात. (इंसिडंटली, मंग्याच्या ऐवजी प्रिन्स व प्रिन्स च्या ऐवजी मंग्या शोभला असता) पोलिस स्टेशनाचा प्रसंग (अर्चीला सोयिस्कररित्या एकटं ठेवलय जीप मध्ये, अरे दूसरा बाप असता तर तडक घरी घेऊन गेला असता, पण मग पूढचं काही च घडायला वाव नव्हता) ट्रेन ने हैद्राबाद, तिथल्या नाट्यमय घडामोडी, देव (बाई)माणूस, तेही मराठी, वेळीच भेटणं, आसरा, काम धंदा ते लग्न बिग्न, रजिस्टर्ड म्हणजे लीगली पर्शा एकवीस वर्षांचा झाल्यावर असणार; मधल्या तीन चार वर्षांच्या काळात पोलिसांनी हमखास पकडल असतं वास्तविक, बापाने ही आकाश पाताळ एक केलं असतं - राजरोस पणे सपोजेडली शेजारील राज्याच्या राजधानीतनं तर चुटकीसरशी हेरल असतं, घेरलं असतं; सगळं किती कृत्रिम वाटत? स्वप्नवत. घर मिळतं, नोकरी मिळते, भाषा येते, वर रिक्शा बिक्शा पकडून रात्री झोपडपट्टीत परतायच. काय हे? किती विस्कळीत?! आणि वारंवार, कित्ती तरी वेळा कित्ती ब्लँक स्पेसेस, किती सायलेन्स प्रसंगा प्रसंगांत; म्हणजे काय बोलायचे तेच कळत नाही पात्रांना (रीड लेखकाला)



अँड (अर्थातच) एन्ड जस्टीफाईज द मीन्स!



नो यार, इटस् नाँट डन.



तांत्रिक बाबींबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. ही सगळी आता यंत्रवत, रोबोटीकली कुशलवत वेल्डेड अंग आहेत, असतातच.



जमेची बाब म्हणजे रिंकू व आशिष हे (मुखवटे) व चेहरे (पण) अप्रतिम चपखल फ्रेश टवटवीत. झिंग झींग झिंगाट सुस्साट! (परंतु, अजय अतुल नी एक तरी, 'काळी एक' मध्ये वा ढोल ताशे न बडवता, व फक्त व्हयोलिन वा बासूरी च्या संगतीने कर्णमधूर (कर्णठळून नको) गाणे द्यावे.



अँड इन धीस गेम आँफ शँडोज, अनडिस्प्यूटेड विनर इज, वन अँड ओन्ली, झी!! डिजीटल मार्केटींग चे कान (व मोबाईल वर फिरणारी बोटं) मंत्र शिकवणी, द पाँवर आँफ सोशल मीडिया.



आता, पासष्ट कोटींच्या सो काँल्ड गल्ल्याबद्दल थोडेसे.



सैराट रिलीज झाला सतरा फेब्रुवारी ला. सिंपल मँथेमँटिक्स:



टोटल दिवस झाले अँप्राँक्स 90

टोटल सिंगल स्क्रीन्स इन महाराष्ट्र अँप्राँक्स 600

टोटल स्क्रीन्स इन महाराष्ट्र (मल्टिप्लेक्स मधली) अँप्राँक्स 600

टोटल = 1200

तिकीटाचा दर अँव्हरेज 100 रूपये (मल्टिप्लेक्स मध्ये बिटविन 130 ते 180 आणि सिंगल स्क्रीन मध्ये 50 ते 80)

दररोज अँव्हरेज शोज = 4

सिटींग कँपँसिटी अँव्हरेज = 300

सगळेच शोज कसे काय हाऊस फुल्ल पकडायचे?  डायव्हर्सीटी 50%

म्हणून दररोज 4 शोज, 150 प्रेक्षक, 100 रूपये तिकीट, सगळीच थेटरं कशी काय हाऊस फुल्ल? डायव्हर्सीटी 50%, म्हणून टोटल 600 थिएटर्स

एका दिवसाची कमाई =

4 गुणीले 150 गुणीले 100 गुणीले 600 = 3 कोटी साठ लाख

आजवरची कमाई = 90 दिवस गुणीले 3 कोटी साठ लाख

= 324 कोटी

वजा थिएटर मालक वगैरे, राहता राहतात व्हाँप्पींग 162 कोटी

हे क्लेम करताहेत 65 कोटी, असेल बुवा, पाँसिबल लगता हैं, दौ अन लाईकली! असेल तर अभिमानाचीच गोष्ट आहे, (बट अनडिझर्वड्!!) हम्मम्मम्म!



वरील विवेचनात्मक समीक्षा इज माय पर्सनल फ्रँक ओपिनियन.



नो हार्ड फिलींग्ज...

---

मिलिंद काळे, 22nd May 2016

No comments:

Post a Comment