Tuesday, May 3, 2016

Er Rational musings #461

Er Rational musings #461



माझी व्हाँट्सअँप व फेसबुक व ब्लॉग वरची, 28 मार्च ची (#453) पोस्ट री-पोस्ट करतोय...

---



Er Rational musings #453



I will enjoy and experience JOMO from 1st April. For a month.



JOMO is "Joy Of Missing Out".



That is, from Social Network (sic).



~ No to Facebook and Whatsapp and Blog.

~ Yes to eMail and phonecall and SMS.



So, it's going to be 2400 hrs of 31st March to 0000 hrs of 1st May.



So long...



मिलिंद काळे, 28th March 2016

---



आज एक मे. बरोब्बर एक महिना. विदाऊट व्हाँअँ, फब व ब्लॉग.



हुश्श! पण खरं सांगू, नाही जमलं, मजा नाही आली, होता एक (थोडा) फसलेला प्रयोग. हे काही खरं नव्हतं;



एक एप्रिल ला, म्हणजे पहिल्याच दिवशी, प्रचंड 'टर्की' आली. (कामातनं गेलेले ड्रग्ज अँडिक्ट असतात ना, त्यांना ड्रग्ज शिवाय ठेवलं ना की त्यांचे हातपाय थरथरायला लागतात, डोळे शून्यात लागतात, डोकं जड होतं, हिंस्र भावना प्रज्वलित होतात वगैरे!) दूसऱ्याच दिवसापासून 'फक्त अँक्सेस' करायला लागलो! म्हणजे वाचायचे, ते सुघ्दा चोरून; व्हाँअँ मध्ये सेटिंग आहे, फब मध्ये दूसऱ्याला तसेही कळत नाही की अँक्सेस करतोय का वगैरे. मध्येच अस्मादिकांचा लग्न वाढदिवस येऊन गेला - फब वरचा डिपी व प्रोफाईल पिक तो बदलना पडता (ही) हैं ना भाई 😍



मग काही रहावेना; तीन पाच जणांना फबवर (ज्यांच्या पोस्टस् माझ्यापर्यंत पोहोचत होत्या - माझ्या फ्रेंड्स नी लाईक वा काँमेंट केलेल्या - त्या अतिशय सुंदर लिहीणाऱ्यांना) फ्रेंड रिक्वेस्ट्स पाठवून झाल्या; काहींनी अँक्सेप्ट केल्या (धन्यवाद!), काहींनी फाxवर मारल्या (तरीही धन्यवाद!!); त्यांच्या व इतर काही पोस्टांवर माझ्या काँमेंट्स लिहून झाल्या!! परंतू, माझ्या कडून अशी एकही पोस्ट वा माझे इंजिनियर्स रँशनल म्यूझिंग वा ब्लाँग कटाक्षाने नाही लिहीला.



अन्न वस्त्र निवारा नोकरी धंदा व फेसबूक व्हाँट्सअँप हे मानवी जीवनाचे अखंड अविभाज्य अन् अन-सेपरेबल घटक आहेत हे च खरे च!!



असो. आजपासून रि स्टार्ट...



www.milindkale.com

www.milindmkale.blogspot.in

---

मिलिंद काळे, 1st May 2016

No comments:

Post a Comment