Er Rational musings #495
सध्या कस आपल्षा सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलय पाण्यानी ना तसच काहीच वर्षांपूर्वी वीजेनी आपला उजेड अंधारला होता.
पाण्याचा तुटवडा, तसा वीजेचा तुटवडा!
पाणी अडवा, जिरवा, वाचवा, तस वीजेचा अपव्यय टाळा, वीजेची बचत करा, वीज वाचवा!
जागोजागी टँकर ने पाणी पूरवठा, तसाच जागोजागी डिझेल जनरेटर ने वीज पूरवठा!
अमूकतमूक च पाणी येण्याच्या वेळा, तशाच 'फ्राँम - टू' लोड शेडींग च्या वेळा!
टँकर माफीया कडून लूटमार, फसवणूक, अडवणूक, तशीच जनसेट भाड्याने देणाऱ्यांची, आँपरेटर्स ची मनमानी, चलती!
सगळच शेम टू शेम. दोन्ही तस बघीतल तर नँचरल रिसोर्सेसच. एक (पाणी) डायरेक्ट तर दूसरी (वीज) डायरेक्ट बाय प्राँडक्ट.
पण आपण जिद्दीने मात केलीये ना वीज टंचाईवर? पाणी टंचाईवर ही नक्कीच करू!
काही थोडीशी च वर्षे जायला लागतील.
पाणी असो वा वीज, निष्काळजी पणा, बेशिस्त, चलता हैं - बहोत हैं ही वृत्ती प्रवृत्ती बनत असताना तो बिचारा जगद्निर्माता शांत कसा काय बसेल, बघ्यासारखा? त्यालाही आपला गाडा हाकायचाय ना?
भगवंताला बरोब्बर कळालय की "वूई लर्न द हार्ड वे" (ओन्ली) !!
आपण शहाण्या मुलासारखे नाही वागलो, वेळीच नाही सुधारलो, तर पूढचा नंबर अन्नाचा असणार आहे, यात शंका नाही.
आपली च अन्नान्न दशा व्हायला नको असेल तर...
---
मिलिंद काळे, 12th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment