Er Rational musings #462
महाराष्ट्र राज्य! जन्मभूमी कर्मभूमी! भारतातलं एकमेव 'राष्ट्र', बाकीची खरे तर राज्येच! सुजलाम सुफलाम (होतं). सोशिक (आहे). सहिष्णू (राहील). आणि (म्हणूनच) सर्वसमावेशक.
अन्न, वस्त्र, पाणी (!), निवारा, नोकरी व्यवसाय, अशा मूलभूत हक्कांतील पिछाडी भरून काढण्यासाठी, नव चैतन्य, नवा उत्साह नवी उमेद जागवणारं, नव उभारी नव भरारी घेण्यासाठी सज्ज करणारं गाणं.
रक्त सळसळलं नाही, हृदयाचे ठोके वाढले नाही, हाताच्या मुठी वळल्या नाही, तरच नवल!
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हां तुझी मुळीहि गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
गीत - राजा बढे
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - शाहीर साबळे
राग - भूप
https://youtu.be/Bot98Qrh2ls
महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शूभेच्छा!!
---
मिलिंद काळे, 1st May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment