Wednesday, May 4, 2016

Er Rational musings #472

Er Rational musings #472



IPL ने सगळ्यांना धंद्याला लावलय.



अहो सर्कसच ती, मनोरंजन करणारी.



बर मुंबई इंडियंस, गुजरात लायन्स, दिल्ली डेयरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायझींग पूणे सूपरजायंट्स वगैरे नावं फसवी आहेत. आपण उगीचच भापात जावून मुंबई इंडियंस ला वगैरे चिअर अप करतो. टिम च्या नावाच्या शहरांचे दोन चार च खेळाङू असतात ओ, बाकीचे लिलावातूनच विकत घेतलेले, जगाच्या पाठीवरचे कुठलेही. आता यांचा मुंबई शी काय अर्थाअर्थी संबंध? हा, 'अर्थपूर्ण' संबंध असणारच ना!



बरं त्या जर्सी नंबरच काय लाँजिक आहे ते एक गूढच; कोणी सत्याहत्तर नंबर तर कोणी एक नंबर तर कोणी चव्वेचाळीस!



एक मात्र खरे, की प्लेयर्स ची नावं जर्सी च्या पाठी, पण खालच्या बाजूला असतात छापलेली. अहो जाहीरातींच्या, स्कोअर च्या वगैरे स्ट्रीप मूळे अर्धाच भाग (वरचा) दिसत असतो बहुतकरून! मग तिथे स्पाँन्सर चा लोगो, नाव इत्यादि ठळकपणे दिसायला नको का कायमचं?!



आफ्टरआँल तेच तर खरं गणित आहे...

---

मिलिंद काळे, 4th May 2016

No comments:

Post a Comment