Thursday, May 26, 2016

Er Rational musings #527

Er Rational musings #527



~ 'इस्स्टाँप आ गया'..

'स्टाँप आ गया' च्या ऐवजी..

हा 'इसस्' चा उच्चार असतो ना तो खूपच मजेशीर. जसे, 'इस्स्टँच्यू'?!

माझा एक बोहरी मुसलमान मित्र आहे, शेठवाला नावाचा. त्याला हे नुसतं 'स' म्हणताच येत नाही, इसस् च म्हणणार, इस्स्स नेच सुरूवात करणार तो. मग आम्हीही त्याला चिडवतो, इसस्शेठवाला..इस्साले...



~ 'ळ' हे अक्षर गुजरातीत नाही. त्याला ते 'ड' उच्चारतात. माझा एक गुजराथी मित्र आहे त्रिवेदी नावाचा. तो मला 'काडे' म्हणून हाक मारतो, त्याला 'ळ' उच्चारताच येत नाही. जसे 'वळ्या' ला 'वड्या'!



~ पोलिसांना / टिकीट चेकर्स ना मामा म्हणायचं हे कुठनं आलं?

मा मा



~ पोपट झाला हे कशावरन आलं असावं? म्हणजे उल्लू बनवणे, मामा बनवणे वगैरे वगैरे.

पो प ट



आणि ते जाऊदे, मामा बनवलं हे तरी कुठनं आलं?



अँक्च्यूअली, मामा म्हणजे आईचा भाऊ, सगळे लाड पुरवणारा वगैरे. पण म्हणजे चांगला!!!



#गंमतजंमतबोलीभाषा



ऐकावं ते नवलच...

---

मिलिंद काळे, 26th May 2016

No comments:

Post a Comment