Er Rational musings #489
बऱ्याच छोट्या हाँटेल्स मध्ये खायला गेलं की मला बहुतकरून 'भीम' भेटतो. म्हणजे त्या छोटेखानी रेस्टाँरंट् मधला वेटर ओ. साधारणपणे आठ ते बारा तेरा टेबलांच हाँटेल, म्हणजे सगळं फूल्ल जरी असलं तरी 16 ते 24 - 28 - 32 खाणारे. पण हा भीम एकटा च सगळ्यांना समर्थपणे कौशल्याने हाताळतो (हाताळणे = आँर्डर्स सर्व्ह करणे, लक्षात ठेवून कोणाला काही हवे नको तिथे बारीक नजर ठेवणे, व महत्वाचे म्हणजे प्राँपर ज्याच त्याचे बील देणे इ). याला 'भीम' म्हणतो मी आम्ही!
'भीम' या नावाची व्युत्पत्ती गिरगावातनं 1985 साली झाली. पहिल्या वहिल्या नोकरीनिमित्त, बाहेर जेवण दूपारचे. मुगभाट लेन समोर असंचं एक छोटूकल हाँटेल वजा खानावळ होती, नाव टेंबे. किडमीड जागा, 12 एक टेबलं, व तिथला कामकुशल वेटर भीम. ओ भीम एक झुणका, ओ भीम आमटी वाटी, भीम एक चपाती, एक ना तीन, चहूबाजूचा हल्ला भीम असला टोलवायचा! अकरा तेरा वर्षे झाली टेंबे बंद होऊन, पण भीम नाव व व्यक्तिरेखा कायमची कोरली गेलीये; म्हणून 'भीम' व त्याच्या भूमिकेबद्दल मला प्रचंड आदर आहे. खवय्या व बल्लवाचार्य यांतला समर्थ सेतू, दूवा.
उघडा डोळे, बघा नीट, तुम्हालाही एखादा 'भीम' गवसेल...
---
मिलिंद काळे, 9th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment