Er Rational musings #478
एल अँड टी ने आम्हा काही जणांना पेजर दिले होते. इमर्जंन्सी मध्ये पेज करता यावं म्हणून. मग ते बघून आम्ही तिथे उलटा फोन करायचो. सगळ्या पवईचा पाँवर सप्लाय हाती असल्याने, वेळी अवेळी इलेक्ट्रिसिटी गेली की आम्ही चाललो रात्री बेरात्री सप्लाय रिस्टोअर करायला - प्राँडक्शन अँफेक्ट होता नये!
मग चक्क आमचे घरचे नंबर, लँडलाईन, अँब्रेव्हेटच केले. म्हणजे पवईतल्या कुठल्याही इंटरकाँम वरून, जरी डायरेक्ट लाईन ची फँसिलिटी नसेल तरीही, अख्या पवईतल्या शेकडोंपैकी कुठल्याही इंटरकाँम वरून 7400 मारला की वाजला माझा घरचा फोन!!
नंतर मी मला एक वाँकी टाँकी च्या साईज चा मोबाईल फोन Nokia 5110 घेतला. कसलं हत्यार ते. इनकमिंग 18 रू च्या आसपास व आऊटगोईंग 22 रू च्या आसपास! पण काय रूबाब, काय स्टाईल, ओये! कमरपट्याला हूक ला क्लिप ला हा डमरू लावून मिरवायचे! आणि एसेमेस टाईप करताना C आला तर तीनदा तसेच H आला तर दोनदा वगैरे बटणं दाबायला लागायची.
रिलायन्स ने सिडीएमए तंत्र आणल, पाँलिफोनिक ट्यून्स चे एलजी वगैरेंचे छोटे चंदेरी फोन आणले. देशभर जमीन उकरून टाकलेल्या फायबर आँप्टिक केबल नेटवर्क ने धीरूभाईंची "करलो दूनिया मूठ्ठी में", व "पोस्टकार्ड च्या किमतीत मोबाईल काँल", व "थिंक बीग" ही स्वप्ने प्रत्यक्षात आणली.
मधल्या काळात पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मोबाईल फोन्स म्मोठ्याचे छ्छोटे छोटे होत गेले, व आता (परत) मोठ्ठे मोठे होत आहेत!
ए जी ओ जी लो जी सूनो जीsss
कहता हूँ मैं जो वो तूम भी कहो़ जीsss
वन टू का फोरsss
1G, 2G, 3G व आता 4G...
---
मिलिंद काळे, 5th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment