Er Rational musings #503
प्रसंग एक
नाजूक मंजूळ रिंग टोन मोबाईलचा खणखणला, मी जस्ट नाव बघितलं कोण आहे ते, काँल रिसीव्ह केला व समोरून तो काही बोलण्याच्या आधीच, मी थ्थोड नाराजीच्या सूरात, थ्थोड चिडक्या स्वरात, थ्थोड कोरड हसत, विचारल त्याला, कोणाचा नंबर हवाय?!?
तो समोरचा थ्थोडा ओशाळला, पण निर्लज्यनिबर बरळलाच हळूसा, अमक्यातमक्याचा नंबर देशील? तूझ्याकडे असणारच ना?
मी म्हणलं, अरे हा इसम आपला फोन ही घेत नाही, कट करतो, शब्द पाळत नाही, आपल्याला फाट्यावर मारतो, तो? हा? कस्सला हक्काने नंबर मागतोय?!
प्रसंग दोन
च्यामारी, आम्ही काय ठेका घेतलाय का यांना सांभाळायचा? नेहमी आम्हीच का? झेपत नाही तर ढोसता कशाला एव्हढी? आमच्याबरोबर घेताना निर्धास्त असतात साले!
मग, नूसतं पाणी, लिंबू पाणी, सोडा पाणी पाजा, सांभाळा, उतरवा, व न्या!! वा झोपवा!!
प्रसंग तीन
मी आपला फोन करतोय, करतोय, त्याने बऱ्याच वेळाने उचलला.
मिटींग मध्ये आहे, नंतर फोन करशील?
अरं बाब्या, मी फोन केलय तर काही कामासाठीच असणार ना? आन् तूझी ती मिटींग फिटींग कवा संपणार, म्यास्नी काय ठावं? थोडं मीन्स पाचेक मिन्टं का चाळीस मीन्ट का नक्की किती?
तू नको का मला उल्टा फोन करायला भाड्या?!
उसासा
परिणाम एकच
पहिल्या केसमध्ये निमूटपणे चडफडत फोन नंबर एसएमएस वा व्हाँट्सअँप करणे!
दूसऱ्या केसमध्ये त्याला त्यांना सूखरूप पोचवणे!
तिसऱ्या केसमध्ये आपणच थोड्या वेळाने टेलिफोन करणे!
प्राक्तन वो ओन्ली प्राक्तन...
---
मिलिंद काळे, 16th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment