Er Rational musings #497
महाराष्ट्र टाईम्स
3पी, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, अल्बिट आँफ अ डिफरंट काईंड;
प्लँटफाँर्म, पाठींबा व प्रोत्साहन!!!
एका पी कडून, म्हणजे पत्र नव्हे मित्राकडून!!!
पत्र नव्हे मित्र हे ब्रीद वाक्य मटा ने पूर्णपणे निभावलय निभवतोय.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं सर्वोत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ते मटा चे च.
अठरा जून एकोणीसशे बासष्ट ते आज, ह्या प्रवासाचं, आमचं काळे कुटुंब साक्षीदार आहे, मी व्यक्तीश: गेली चाळीस त्रेचाळीस वर्षे मटा वाचतोय, व्यसनच जङलय म्हणा ना!
रत्नदर्पण कर्णिक साहेब, ज्येष्ठ गोविंदराव तळवळकर साहेब यांनी रचला पाया व आता पानवलकर सर चढविती कळस, अस आज आनंदाने नमूद करावस वाटतय.
मटा इज अ बाँर्न लिडर. मटा ने पूढाकार घ्यायचा, नवनवे उपक्रम राबवायचे, नवीन कल्पना मांडायच्या, असं पहिल्यापासून होतं; त्याला भारतकूमार राऊत साहेब व पानवलकर सर यांनी वेगळाच बाज दिला, वेगळीच उंची गाठली मटाने त्यामूळे!
संपादकीय, अग्रलेख, मटा सन्मान, बळ हवे पंखांना, मुंबई टाईम्स, मटा कार्निव्हल, दसरा नवरंग, श्रावण क्वीन, मटा अंतरे, प्राँपर्टी टाईम्स, दखल, तरूणाई डिपी, काँलेज कट्टा, ते हा आजचा सिटीजन रिपोर्टर...
(मे नाँट बी इन द सेम आँर्डर)
किती लोकाभिमूक! जनमानसाची नस ओळखून, त्यावर कामाला लागणं ही मटा ची वैशिष्ट्य!
इंटरअँक्टिव्ह, अकाँटेबिलिटी, हक्कांची जाणीव, त्यासाठी योग्य प्लँटफाँर्म, पाठींबा, प्रोत्साहन व हे किती कन्व्हिनियंट! किती आभार मानावेत बेनेट कोलमन समूहाचे, मटाचे व संपूर्ण मटा टिमचे!?
पूढच्या वाटचाली साठी मन:पूर्वक शूभेच्छा.
मटा ओ इतर काही नाही, फक्त मटा,
संपादकीय व अग्रलेख मोलाचे असता
समाजमनाच्या जङणघडणीत,
आपण मार्गदर्शक ठरता
सोशियो कल्चरल पाँलिटिकल
मराठी माणसाच्या प्रगतीत
आपला खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा!
तुमचा, माझा, अहो, आपलाच सर्वांचा
लाडका मटा...
---
मिलिंद काळे, 13th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment