Er Rational musings #493
...कोणी गाढ झोपलय तर कोणी पेपर वाचतय. कोणी मोबाईल वर बोलतय तर कोणी झोपलय तर पण दरेक स्टेशनला डोळे किलकिले करून बघतय. कोणी इकडून तिकडून टकमक बघतय तर कोणी मोबाईल वर गेम खेळतय. कोणी शांत निवांत खिडकी बाहेरच बघतय तर कोणी मोबाईल वर गाणी ऐकतय. कोणी वहीत काहीतरी जप लिहीतय तर कोणी पक्ते खेळतय. कोणी भजनं गातय तर कोणी ट्रेनचा पत्रा बडवतय. कोणी तंबाखू मळतय तर कोणी विचार करतय. कोणी गप्पा मारतय तर कोणी काहीतरी खातय. मूंबई लोकल ट्रेन चे सहप्रवासी हे सारे. व हे सारे कशासाठी तर पोटासाठी.
डे इन डे आऊट. ईयर आफ्टर ईयर. आविभाज्य घटक @मुंबई लाईफ. मूंबई ची लोकल, लाईफ लाईन. ऊन असो वा थंडी असो वा पाऊस, सकाळ असो वा दूपार वा संध्याकाळ वा रात्र, अविरत अव्याहत.
धीस ग्रेट सिटी नेव्हर सिझेस टू अमेझ मी !!
लव्ह यू !!
ऐ दिल हैं मूश्कील ज़ीना यहाँ
जरा हटके जरा ब़चके
ये हैं मूंबई मेरी जा़न...
---
मिलिंद काळे, 13th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment