Wednesday, May 25, 2016

Er Rational musings #523

Er Rational musings #523



दिवसामागी दिवस जाती

रात सरूनी असंख्य रात्री

मराठी मालिका आई बघती

लाडका रिमोट ठेवूनी हाती



सासू सूनेतील भांडणे दिसती

कधी जुळती रेशामगाठी

कटकारस्थाने रोज शिजती

आईची ही फूका आवड नसती



विरंगुळा खाली अंगणात नेती

माया मिलिंद वा आर्यन सोबती

नको नको म्हणत सजती, येती

आई आमुची टेकत काठी टेकती



ढोकळा, पापडी, बटाटावडा खाती

हळूच काहीतरी गोड ही चरती

धन्य ही आई आमुची, अशीच असती

आता सहा काळ्यांच्याच अवती भवती

---

मिलिंद काळे, 25th May 2016

No comments:

Post a Comment