Saturday, May 28, 2016

Er Rational musings #532

Er Rational musings #532



भीमा (सुतार), मुन्ना (प्लंबर), व दिपक (वायरमन) ह्या तिघांना मी पंचवास सत्तावीस एकतीस वर्षांपासून बघतोय, ओळखतोय. हे तिघेजण आहेत आमचे खानदानी हँडीमेन!



कुठलही छोटंमोठ्ठ काम असलं की यांपैकी कोणीएक त्याचे रिस्पेक्टिव्हली रिलेव्हंट काम करून जातो. कामाची क्वालिटी उत्तमच. पहिले पहिले हे लोक्स चालत फिरत कामं करायचे. आता त्यातल्या भीमा व मुन्ना सायकल वर फिरतात, व दिपक बाईकवर, इतकासाच फरक!



कित्ती तरी अशी हातावर पोट असलेली माणसं असतील, असतात ना? मटेरियल का इतना और लेबर आँप समझ के दे दो, म्हणणारी. असंघटित कामगार. मिनिमम लेबर चार्जेस/डे वेजेस वगैरे ची ऐशी की तैशी.



दूसरीकडे आहे सिक्स्थ सेवन्थ पे कमिशन, ओटी, काँप आँफ, कन्व्हेयन्स, एलटीए, बोनस (सानुग्रह अनुदान!), उचल, फ्यूअल अँड मेंटेनन्स इ पर्कस्, पीएफ, ग्रँज्यूईटी, अाणि तत्सम बरच काही ना बाही!



ही विषमता, दरी दूर करायला हवीये.



तरी बरं, हल्ली काही वेब बेस्ड सर्विसेस सुरू झाल्यात, होताहेत (उदा. हाऊसजाँय डाँट काँम, सर्व्हिस्सिंग डाँट काँम वगैरे). इथे असे हँडीमेन घाऊक प्रोव्हाईड केले जातात.



प्रातिनिधीक भीमा, मुन्ना व दिपक, इ अंडर वन रूफ...

---

मिलिन्न्द काळे, 28th May 2016

No comments:

Post a Comment