Er Rational musings #537
तिरळी बिरळी व्हायची. कसल्या त्या बटा! डोळ्यांवर. चालताना दिसतय तरी का? उगाच धडपडायची, आपटायची कुठेतरी. चांगले मस्त केस आहेत, बांधावे पाठीमागे, व छ्छान वेणी घालावी. हे कसलं, अर्धे केस एका डोळ्यांसमोर लटकतायत, सारखे.
तोंडपट्टा चालूच, कोंजरकर काकू उवाच.
या कोंजरकर काकू म्हणजे आमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या. संध्याकाळचा मुक्काम आमच्याकडेच बहुतेक दिवशी. कारण, सर्व बाजूनी गुजराती लोकांत वेढलेले आम्ही, काही हातावर मोजण्याएव्हढीच मराठी कुटुंबे तग (व जागा) धरून होतो. आमच घर मेन रोडवर, खिडकीत बसलं की पटापट वेळ जायचा. प्लस हाँल खूप मोठा, व मध्ये जुन्या टाईपच्या मोठ्ठाल्या तीन खिडक्या!
काकू तशा चांगल्याच 'जून' वळणाच्या. पण प्रेमळ. व जगाची काळजी असल्यामुळे त्या बिचाऱ्या पोटतिडीकीने बोलायच्या. 'हल्लीच्या' मुलींकडे विशेष बारीक लक्ष!
मधे असच. या कशा काय सँडल्स घालतात, मुलांसारख्या? दोघेही सारखेच. मुलींनी मस्त चपला घालाव्यात, नाँर्मल मुलींच्या सँडल्स घालाव्यात, तर ह्या आपल्या मुलांसारखेच, ते आँल सिझन, का काय ते फ्लोटर्स!
लेगीन्स घालून जाणारी मुलगी बघीतली, की झालं. कसल्या त्या तंग विजारी. मांड्या बिंड्या दिसतात की! बरं, आणि ह्या एव्हढ्या टाईट, की फाटायच्या बिटायच्या...
बाप रे, आणि आई गं, काकूंना रिझनिंग देता देता नाकी नव्वद यायचे. स्वभाव असतो एकेकाचा, व जेन्यूईन माणसांचा राग नाही येत.
हो ना?...
---
मिलिन्न्द काळे, 30th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment