Er Rational musings #484
~ काय बाई हे, मोकळा गळा, कानात काही नाही, आणि कपाळ तर बघ, कुंकू जाऊदे, साधी टिकली पण नाही! आणि खाली गोणपाट (म्हणजे जीन्स आे) आन् ते कस्सले उंच टोकदार हिल्स का काय ते, हाय हिल्स - पाय मुरगळायचा ना. काय ह्या हल्लीच्या मुली, दंड उघडे, हे एवढे मोठ्टे गळे. आणखीन ते पंजाबी का काय कसले ड्रेस...
सुरूच.
~ अग आज्जी, तुमच्या साडी चोळी पेक्षा बर की नाही? पाठ, पोट उघडं असण्यापेक्षा. हज्जार वेळा पदर सांभाळण्यापेक्षा. शिवाय किती कंफर्टेबल.
~ बघ बाई, मला नाही असली थेरं पसंद. आमच्या वेळी...
~ अग जग किती पूढे गेलय; कुठल्या काळात वावरतेयस..!
सुरूच.
~ आम्ही नाही बाई इतकं मुलांच्या अंगाशी करत. कसलं ते मिठ्या मारणं, गळे पडणं. रात्री बेरात्री बाईकवर पाठी चिकटून भटकणं. आणि कसली ती बाईक, ही अश्शी पाठनं उंच, म्हणजे पाठचा माणूस घसरत सरकत पुढच्याच्या पाठी आपटलाच पाहीजे. टिचभर, मांड्या उघड्या दिसणाऱ्या चड्या.
सुरूच.
~ अग आई, किती कंफर्टेबल.
~ बघ बाई, मला नाही असली थेरं पसंद. आमच्या वेळी...
~ अग जग किती पूढे गेलय; कुठल्या काळात वावरतेयस..!
सुरूच.
प्रत्येक पिढीत फरक पडत जातो. हे वास्तव आहे. बरोबर, चूक, बर वाईट इत्यादि असं काहीही नसतं. त्या त्या वेळेस जे ते आपणहून सच्चे आहेत; प्रामाणिक आहेत त्या भूमिका.
सरते शेवटी आपण, आपली माणसं, आपल्या माणसांची कंफर्टेबिलीटी / ईच्छा / आवड निवड / मोकळीक.
आणि आपल्याच माणसांवरील विश्वास...
---
मिलिंद काळे, 7th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment