Er Rational musings #512
नाव मोठ्ठ लक्षण खोटं.
परत, परत एकदा, पैसे वसूलीसाठी पूण्यनगरीत हजर होणार. नामांकित इंजिनियरिंग कंपनी चे काम संपवून महिन्नोंमहिने झाले, पेमेंट अजूनही नाही. एव्हढी जूनी, नावाजलेली, एका नगरालाच नावात सामावून घेतलेली, भारतातली एक अग्रगण्य समूहाचा भाग असलेली इंडस्ट्री.
छोट्या व्यावसायिकांना बुडवण्यात पेंडिंग पेमेंट हे एक फोरमोस्ट कारण असावं. या असल्या, बापजाद्यांनी सुरू केलेल्या, वाढवलेल्या कंपन्या, व आता आमच्यासारख्यांना 'धंद्याला' व 'धक्याला' लावणाऱ्या सो काँल्ड मोठ्या कंपन्या यांच्या मँनेजमेंटनी सरळ बंद करून टाकल्या पाहीजेत.
नाचता येईना, अंगण वाक्ड. जमत नाहीये ना, पसारा सांभाळायला.
या अशा कंपन्या म्हणजे दूरून डोंगर साजरे.
पण काय करणार मी पामर, कारण निर्लज्जम सदा सूखी.
आता त्यांचं कामही संपलय, त्यामूळे गरज सरो आणि वैद्य मरो.
प्रयत्न करणे हेच आपल्या हाताताहे, प्रयत्नांती परमेश्वर.
आज परत रिक्वेस्ट करणारे; बघूया, वन्स मोअर, उद्यापासून नो मोअर, मध्ये कन्व्हर्ट होतय का?
असेल माझा हरि, तर देईल खाटल्यावरी.
आमेन...
---
मिलिंद काळे, 20th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment