Er Rational musings #493
ऐशीच्या दशकात मुंबईतल्या गिरण्या, संपानंतर कायमच्या बंद पडल्या. नव्वदीच्या दशकात एकंदरितच इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये दहशतवजा अराजकता वाढली. दोन हजार च्या दशकात मुंबईतली इंडस्ट्री पूर्णपणे खिळखिळी झाली व आता नामशेष झाल्यातच जमा आहे.
लहान मोठे उद्योगधंदे आधीच भिवंडी, वाडा, विठ्टलवाडी, महापे, पवना, वापी, अंबरनाथ, वसई इ ठिकाणी गेलेते. मोठ्या म्हणाव्यात अशा आता उरल्यात फक्त लार्सन अँड टूब्रो, गोदरेज, महिंद्रा एंड महिंद्रा, क्राँम्प्टन, बास्स. तेही कसेबसे, बहुतेक महत्वाची आँपरेशन्स - प्राँडक्शन बाहेर हलवून बसलेत, उरलेलं सगळं हळूहळू कमी कमी करत करत बंद कधीही करतील. नक्कीच. बाकी काहींनी आर अँड डी वगैरे इथे ठेवलय, इतर मुंबई बाहेर.
रिचर्डसन क्रूडास, प्रिमियर, रँलीज, हेक्ख्स्ट, डंकन श्रेडर, सिप्ला, जाँन्सन अँड जाँन्सन, मे अँड बेकर, ङब्ल्यूईएल, सिएट, वेस्टरवर्कस, सीपी टूल्स, इंडियन आँक्सिजन, इ अनेक!
हाँस्पिटँलिटी, एंटरटेनमेंट, सेवा व्यवसाय, बँक आँफीस अँक्टिव्हिटीज, आयटी, आयटीईएस, बँकींग अशा अनेकविध कमर्शियल अँक्टिव्हिटीज (व अर्थातच व्हर्टिकल रेसिडेंशियल) जोरात आहेत सध्या तरी. मेट्रो रेल्वे, मोनो रेल, सागरी अंतर्गत वाहतूक, कोस्टल रोड, अशा दळणवळणाच्या कामांत पूढील वीस पंचवीस वर्षे बिझी जाणारेत. एक दोन मोठी स्मारके आहेतच. कुशल अकुशल कामगार वर्ग, सल्लागार, तंत्रज्ञ, यांना पूढचा काळ भयंकर काम असणारे.
स्मार्ट सिटी ही नुसती घोषणा न ठरता, सगळ्यांनी क्रयशील सहभाग घेतला तर खरी मजा येईल काम करायला.
आफ्टरआँल, स्मार्ट सिटी म्हणजे नथींग बट 'आय टी' एनेबल्ड 'लिव्हेबल सिटी'; इन अ ब्राँडर सेन्स...
---
मिलिंद काळे, 11th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment