Thursday, May 19, 2016

Er Rational musings #511

Er Rational musings #511



हवेचा परिणाम. अस्स घाण वेदर (क्लायमेट) आहे ना. सगळीकडे, जो तो आपला सर्दी वा खोकला वा काहीच नाही तर प्राँब्लेमँटिक घसा ने त्रस्त.



आणि हल्लीचा डाँक्टर पण असा. कसा?



काही नाही सिझनल आहे.

नाही, तर, व्हायरल आहे.

नाहीतर, तर, कसला तरी नाँशीया आहे.

नाहीच नाही तर, कसलं तरी इन्फेक्शन आहे.

काहीच नाही, तर, कसली तरी अँलर्जी आहे.

अगदीच काहीच नाही, तर, बाहेर कुठंतरी प्यायलेल्या पाण्यावर वा बाहेर कुठंतरी खाल्लेल्या अन्नावर गाडी घसरणार, येऊन ठेपणार / थांबणार.



काही सम्माननीय अपवाद वगळा. सर्वत्र हेच चित्र. मग सुरू होतं ब्लड सँपल सहित मलमूत्र इत्यादि सर्व चाचण्यांचे सत्र. त्याबरहुकूम डायरेक्टेड टू स्पेश्यालिस्ट इतरत्र!



जीएफएएम जीपी डाँक्सच बरे होते, खरे नाडी परीक्षा असणारे व चुटकीसरशी नस अन् नस जाणणारे.



आता किमान नऊ बाराा वर्षे प्लस दीड दोन कोटी, इज इक्वल टू एमबीबीएस प्लस एमडी/एमएस प्लस एखादा स्पेश्लिटी पोस्ट ग्रँज्यूएट प्राविण्य डिप्लोमा कोर्स वगैरे.



कालाय तस्मै नम:...

---

मिलिंद काळे, 19th May 2016

No comments:

Post a Comment