Sunday, May 15, 2016

Er Rational musings #502

Er Rational musings #502



MRF रेन डे, अशी जाहीरात अजून पेपर मध्ये येत नाहीये. येईल, लवकरच येईल. सात जून अशी कुठलीतरी तारीख (मोस्टली 7 ते 11 जून) ठळकपणे मेंशन केली जाईल, व नंतर दररोज उलटं काऊंट डाऊन सुरू, 6 डेज टू गो, टू डेज टू गो, वगैरे.



अ यू एस पी (USP = Unique Selling Point) आँफ एम आर एफ टायर्स.



सन ब्रँड छत्र्या, डकबँक चे रेनकोट, गमबूट, पावसाळी दप्तरं (स्साँरी, स्कूल बँग्ज!), मोबाईल ची प्लँस्टीकची कव्हरं, टू व्हीलर्स (मोटार सायकल) ना पूढे, पायांच्या समोरच्या बार वर लावायचे पुठ्ठे, फोर व्हीलर्स चे वायपर्स, ते अगदी बाल्कनीज वर आच्छादायची प्लँस्टीकची आवरणं, इत्यादि अनेक कामं करायची असतात, आयुधं परजायची असतात, तयारी करायची असते.



पण, (हा 'पण' सगळ्यात आडवा येतो), पहिला वहिला पाऊस सगळ्यांना चकवा देतो. कित्तीही काहीही म्हणा, पहिली वहिली पावसाची सर असली झोडपते की आपल्या सर्वांचीच त्रेधातिरपीट उडते. दाणादाण.



जाऊद्या ओ. पहिल्या पावसांत चिंब भिजा, शिंब भिजा, नखशिखांत भिजा, सग्गळ अंग सग्गळे कपडे ओलेते होऊद्यात. स्वागत करा. अनुभवा.



पहिली आठवण कोणती येईल सर्वांना, माहीतीये? अतिवृष्टीमुळे, आज शाळा लवकर सोडण्यात येणार आहे!!



पावसाचा पहिला दिवस सात जून असणार आहे व खराखूरा शेवटचा दिवस, दोन आँक्टोबर!



#पाऊस आगमन आतूर मिलिंदमोरेश्वरकाळे



येरेयेरे पावसा, तूला देतो...

---

मिलिंद काळे, 16th May 2016

No comments:

Post a Comment