Er Rational musings #492
तसं म्हटल तर हल्ली हल्लीच.
दूनियादारी, एम टू एम 2, कट्यार, बाजीराव, आणि आता (परवलीचा) सैराट.
सिनेमा प्रोमोज ची पूर्वापार रूळलेली पध्दत आमूलाग्र बदलतीये. तीसेक वीसेक वर्षांपूर्वी स्क्रीन, फेमिना, स्टार डस्ट व तत्सम नियतकालिकांतून आगामी पिक्चर्स, त्यांचे रिव्ह्यूज इत्यादि यायचे, तेव्हा लोकांना समजायचे. मग पोस्टर्स चिकटायची जागोजागी. पूढील अँट्रँक्शन वा नेक्स्ट चेंज वगैरे कळायचे. थोडी(शीच) चर्चा होत असे. मग आलं, गाणी - अल्बम रिलीज वगैरे; कलाकार मंडळींच्या उपस्थितित फोटो सेशन, जरासा गाजावाजा प्रसिद्धी वगैरे.
व आता, सोशल नेटवर्क.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा खूबीने व्यावसायिक वापर, असं ढोबळ मानानं म्हणता येईल या प्रोमो ला. कंन्व्हेंशनल वे पेक्षा एक पंचमांश पण खर्च येत नसावा. दोन रिव्ह्यू पेरायचे, प्रोफेशनली. एक व्हाँट्सअँप वर, (मूव्ही च्या बाजूने एक व एक क्रिटिसाईज करणारा). एक फेसबूक वर. सेम. सुरूवात करायची, लावून द्यायची. बस्स, एव्हढेच करायचे, त्याचा काय तो खर्च असणार? अँमवे, जपान लाईफ, हर्बल लाईफ, तत्सम एम एल एम, आपसूक मल्टी लेव्हल मार्केटिंग.
मग, विषय अधनमधनं तापता ठेवायचा, लाईव्ह ठेवायचा. ह्ही अलोट गर्दी. चक्रवाढ उत्सुकता, कुतूहल, अपेक्षा, कल्मिनेटींग इनटू सतरा एकवीस कोटींचा गल्ला, कमाई.
गूड फाँर मराठी फिल्म इंडस्ट्री, बट...
---
मिलिंद काळे, 11th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment