Thursday, May 5, 2016

Er Rational musings #477

Er Rational musings #477



जपान



2008 मध्ये जपान ला जायचा योग आला होता. तेव्हा मी रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये कामाला होतो. कंपनीच्या कामासाठी, तिथल्या पाँवर यूटिलिटी TEPCO च्या निमंत्रणावरून आमची पाच जणांची टिम होती. पंधरा दिवसांकरता टोकयो, शिंबासी इ ठिकाणी गेलो, त्यांच्या पाँवर प्लँट्स ना, वीज वितरण केंद्रांना, सब स्टेशन्सना, कंट्रोल रूम्सना, भेटी दिल्या. सात आठ वर्ष झाली, पण तेव्हाची सुध्दा त्यांची टेक्नोलॉजी एव्हढी अद्ययावत, प्रगत होती. विशेष बाब म्हणजे टेक्नोलॉजी बाबत स्वयंपूर्ण असणारी होती. मित्सुबिशी, हिटाची सारख्या जँपनीज (च) कंपन्यांची सर्व उपकरणं, सिस्टीम्स व आँटोमेशन! अक्षरशः थक्क करणारं सगळं.



~ आमच्या व्हिजीटच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी यासूशी ईडा (TEPCO तला जनरल मँनेजर, आमचा को आँर्डिनेटर) ने सांगितले उद्या छत्र्या लागतील, स्माँल ड्रिझल चा अनुमान वेधशाळेनं वर्तवलाय. आम्ही अचंब्यात; हे डायजेस्ट करायला थोडं कठीणच, तेव्हाची आपली हवामानाची प्रेडिक्शन्स बघता (आता परिस्थिति बदललीये, no hard feelings!). आणि खरंच सांगितलेल्या दिवशी सांगितलेलाच पाऊस पडला!!



~ दूपारच्या लंच टाईम मध्ये सर्व आँफिस मधले दिवे बंद, आपापल्या खूर्चीवर अर्धे अधिक लोकं चक्क झोपलेले! पण लंच टाईम संपताक्षणीक काम चालू, सीरियसली!



~ सर्व टँक्सीज (टँक्सी चालिका पण खूप होत्या - त्यांनाही रात्री खूप उशीरापर्यंत रस्त्यांवर बघितलं!), GPS व शहराच्या नकाशाने सज्ज. इंग्लीश बोलता येत नसून देखील कोणत्याच जँपनीजच काही अडत नाही.



~ रिस्पेक्ट, ग्रिटींग्ज, अदब ही काही मुरलेली वैशिष्ट्य असावीत इथे.



माधवच्या पोस्टमुळे या आठवणी जाग्या झाल्या.



हे सर्व साताठ वर्षांपूर्वीच, त्सूनामी च्या अगोदरचं.



पण ग्रेट कंट्री...

---

मिलिंद काळे, 5th May 2016

No comments:

Post a Comment