Tuesday, May 24, 2016

Er Rational musings #520

Er Rational musings #520



"या आठवड्यात करतो", असे कोणी म्हणले की समजावे म्हणजे हमखास करणार नाही, व परत शुक्रवार शनिवारी आठवण करून द्यायला लागणार!

कळवतो म्हटलं, की आणखीनच टोक, म्हणजे सिंपली = विसरा sss

कशाला उगी जुलूमाचा रामराम??!!

चांगल्यामध्ये नकार (शक्यतो) देण्याचाही हा एक मार्ग आहे.

उद्याच वा फारतर परवाच करतो, असा रिस्पाँन्स आला, की समजाव, काम होणार - झालं.



बरं, हे लोक्स आपापल्या ओव्हर स्मार्टफोन मध्ये कँलेंडर एंन्ट्री, रिमाइंडर वगैरे का लावत नाहीत, वा कुठेतरी नोट डाऊन वगैरे का करून ठेवत नाहीत? काही समजत नाही.



ठंडा करके खाँव, हे तर माँडर्न मँनेजमेंटचे टेक्नीक आहे. लवकर डिसीजन द्यायचाच नाही, ईमेल ला वगैरे लवकर उत्तर द्यायचंच नाही. नो हरी अँट आँल; म्हणजे तोपरेस्तो मँटर शमलेला असतो वा विषय तसा साईडिंगला आपोआपच पडलेला असतो.



याउप्पर, त्या इश्यू वा मँटर पेक्षा भारी असतं ते हे:

~ तो विषय किती महत्वाचा आहे ते.

~ त्या गोष्टीची किती गरज आहे ते.

~ त्या विषयाचा प्राधान्य क्रम, आणि

~ ते काम किती अर्जंट आहे ते.



परंतु फोरमोस्ट इज

तुमचं व त्या व्यक्ति चं नातं, इंटर पर्सनल रिलेशन. तुमचं त्याच्यालेखी असलेलं महत्व, व तुम्ही त्या व्यक्ति साठी यापूढे किती महत्वाचे आहात ते. शिवाय, तुमची त्या व्यक्ति ला किती गरज आहे ते.



भावना गेली चूलीत, याला म्हणतात व्यवहार चातुर्य.



सहीं में दहीं...

---

मिलिंद काळे, 24th May 2016

No comments:

Post a Comment