Er Rational musings #510
काही जागा निमंत्रितांसाठी राखीव. 'केवळ निमंत्रितांसाठी' असा फलक. बहूतेक वेळा पहिल्या तीन रांगांसाठी.
नाटक वा संगीताचा कार्यक्रम वा भाषणं, व्याख्यानमाला वगैरे पहिल्या रांगेत, मध्यभागी, बसून बघण्याचे भाग्य हे केवळ निमंत्रितांच्याच नशीबी!!
पूर्वी कधी अशी नाटकं बघितल्याच आठवतय. अँड इट इज रिअली अ ग्रेट एक्स्पिरियन्स!
आता?
जनरल पब्लिक थोडसं असूयेनच यांकडे लक्ष देतं. मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ, वयस्कर ओळखीपाळखीचे, आणि अर्थातच आयोजक संयोजक व प्रायोजक या सर्वांची मांदीयाळी.
आपलं, निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला जायचं भाग्य कस काय येणार बूवा?! कठीण दिसतय.
सो फर्गेट अबाऊट फर्स्ट डे फर्स्ट शो इन फर्स्ट रो.
बी रियलिस्टिक यार...
---
मिलिंद काळे, 19th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment