Saturday, May 21, 2016

Er Rational musings #515

Er Rational musings #515



मम्माज बाँय व पापाज गर्ल अशी साधारणत: संज्ञा प्रचलित झालीये, अशीच विभागणी झालीये. मोस्टली मुलं दिसतातही तश्शीच, म्हणजे मुलगा मातृमुखी व मुलगी पितृमुखी. बरं, मुलीसाठी बाप हाच हिरो व मुलासांठी आई म्हणजे सर्वस्व. आणि मुलं आईबापाच्या गळ्यातले ताईत.



अगदीच आई/बापा वर गेलाय/गेलीये हे सर्रास ऐकायला मिळतं. हे थोडस् अध्यारूतच आहे, कारण डिएनअे अन् जीन्स आईबापाचेच असतात ना. हम्मम्मम्म...



बऱ्याच वेळा हे काही(च) वर्षे टिकतं. मुलांनां शींगं फुटायला लागली की थोडे खटके फुटायला लागतात. पण हा बहुतकरूनपणे स्वाभाविक स्थित्यंतराचा भाग असतो, काही काळ चालत असं, पण स्टँबिलाईज ही होतं, कालापरत्वे. हल्ली तरूणाईत तर मँच्यूरिटी लवकर येतेय असं वाटतय, आश्वासक परिस्थिति. खूलेपणा व मोकळेपणा व स्वतंत्र तरी परिपक्वता, ही या युवा पिढीची वैशिष्ट्य म्हणावी लागतील.



आपण अनुभवलेली, पाहीलेली भाऊबंदकी, घरातले, नातेवाईकांतले अतर्गत कलह, वाद विवाद, थ्थोडेसे कमी झाल्याचाही यात हातभार असावा.



एकंदरितच, ममाज बाँय असो वा पापाज गर्ल, हे पिलर्स आँफ स्ट्रेंग्थ बनताहेत, बनलेत.



काँटेंपररी ग्रँड 'ओल्ड' यंगीस्तान, ब्रँव्हो...

---

मिलिंद काळे, 21st May 2016

No comments:

Post a Comment