Er Rational musings #514
"नाम अब्दूल हैं मेरा, सबकी खबर रखता हूँ"...हे शान सिनेमातल मजहर खान वर चित्रीत झालेलं गाणं बघितल, की मला आठवते ती दूचाकी ची साईड कार. मजहर खान अपंग असतो, व तो चाकं लावलेल्या फळीवरून झपझप्प सट्टाक वावरत असतो, असं दाखवलय. शान मध्ये.
ह्या साईड कार मध्ये बसलं की अक्षरशः जमिनीवर अल्मोस्ट टच होत हवेत तरंगणारं उडणारं विमानच जणू. माझ्या एका काकांची होती अँपी 100 स्कूटर विथ साईड कार; काय मजा यायची त्यात बसून फिरायला!!
या साईड कारने अनेक चित्रपटांत मोलाची भूमिका बजावलीये. अगदी पाश्चात्य वाँर पट असोत वा आपला अजरामर शोले! साईड कार म्हणजे खरोखरच शान! ही तिचाकी म्हणजे पूर्वीची फँमिली कार. बाप्या चालवतोय, बँलन्सिंग होण्यासाठी मँडम (ध्धाप्पकन्न) पाय दुमडून, साडीचा घोळ सांभाळत, साईड कारच्या गाभाऱ्यात, व पोरं बाप्याच्या पाठी; शानकी सवारी.
इंसिडंटली, मी जेव्हा माझी पहिली बाईक, तेव्हा भारतात प्रथमच लाँच झालेली फोर स्ट्रोक हिरो होंडा सीडी 100 घेण्याचे ठरवले, साधारणपणे 1985 साली, तेव्हा आमचे अण्णा म्हणाले होते की साईड कार लावून घे! (त्यांच्या मनात होतं सेफ्टी म्हणून); अर्थातच तो सल्ला मी जूमानला नाहीच. असो.
परंतु सध्या जाम ईच्छा होतीये, अँक्टिव्हा ला साईड कार लावून घ्यायची.
बघूया कस काय जमतेय ते...
---
मिलिंद काळे, 21st May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment