Friday, May 27, 2016

Er Rational musings #531

Er Rational musings #531



स्थळ: पेट्रोल पंप (कुठलाही)

परिस्थिति: दूचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांच्या रांगा

वस्तुस्थिति:



जनरली स्पिकींग

दूचाकी: शंभर वा दोनशे रूपयांचे पेट्रोल, क्वचित एखाद्तीन लोक्स पाचशे रूपयांचे.

तीचाकी, बहुतेक सिएनजी वाले,

चार चाकी: पाचशे वा हजार रूपयांचे इंधन, क्वचित दोन्सहा लोक्स दोन हजार रूपयांचे.



जनरली स्पिकींग

पंपाचा काटा, आँटो सेट केलेला असतो. म्हणजे शंभर, दोनशे, पाचशे, हजार फीड (एंटर) केले की, कट्टक्कन्न पाईपातन लास्टला फ्यूएल बंद होत, या रकमांच पेट्रोल वा डिझेल भरल गेलं की.



वेळोवेळी, पंप चालक, सेटींग बदलतात, पेट्रोल डिझेल चे भाव बदलले की. सर्वसाधारणत: शंभर दोनशे पाचशे हजार रूपयांच्या इक्वीव्हँलंट इंधनाचे. उदाहरणार्थ, 70 रूपये लिटर पेट्रोल असेल तर सेटींग ठेवले पाहीजे 1.4285 आणि डिस्प्लेही झाले पाहीजे 1.4285, भरलेली तेव्हढेच गेले पाहीजे, हो की नाही? पेट्रोल डिझेल भरताना, अमाऊंट फीड केली जाते मशीन मध्ये. समजा, धरून चाला, वरील उदाहरणामध्येच, 1.41 च डिस्प्ले झाले, वा अँक्च्यूअल तेव्हढेच भरले गेले इंधन, तर? आपण, दररोज थोडीच लक्ष ठेवतोय देतोय, भावावर?



'फिल इट, शट इट, फर्गेट इट', हा आपला मूलमंत्र.



या असल्या साचेबंद ठरावीक अमाऊंटस् वर सेटींग पाँईंट झिरो फाइव्ह ने जरी चुकलं, चुकवलं, नजरचूकीने वा मुद्दामहून, तर? रिअँलिस्टीकली, एक दीड लक्ष रूपये तरी पंप मालक सहज कमावू शकतात, वा कमावत असतील ही.



उपाय: अत्तिशय सोप्पा

पेट्रोल वा डिझेल भरताना, कधीही, चुकूनसुध्दा शंभर, दोनशे, पाचशे, हजार अशा फिक्स्ड अमाऊंटचे भरू नका! रँडम अमाऊंट भरा; एकशे दहा वीस वा नव्वद वा एकशे ऐशी वा दोनशे दहा वगैरे! (दूचाकी साठी) आणि, साडे चारशे वा नऊशे वा सोळाशे - अठराशे पन्नास वगैरे! (चारचाकी साठी)! यामुळे, पेट्रोल डिझेल भरणाऱ्याला मँन्यूअली तेव्हढ्या(च)च रकमेचं भराव लागत.



कशाला चान्स घ्या; फूकटचे पंपवाल्याच्या घशात घाला पैसे? आफ्टरआँल इटस् अवर हार्ड अर्नड् मनी ना?



छोट्या छोट्या आयडीयाच्या कल्पना...

---

मिलिन्न्द काळे, 28th May 2016

No comments:

Post a Comment