Monday, May 23, 2016

Er Rational musings #518

Er Rational musings #518



~ सांबार चटणी थोडा जादा देना! सूका चटणी अलगसे बांधो. मिरची डालना. कांदा लिंबू अलग. एक्स्ट्रा देना.

खायचे पदार्थ पार्सल घेतानाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत या. एकदम नँचरली.



~ दो थैली अलगसे डालो, अंदरही.

कापडं बिपडं घेतानाची इन्स्ट्रक्शन.



~ थोडा और डालो, कम हैं.

भाजी फळ बिळं घेतानाच्या इन्स्ट्रक्शन्स.



और एक मसाला पूरी देना. कुछ कम करो. डिस्काउंट देना. बराबर बताना हाँ. लाल हैं ना, मीठा हैं क्या, पकेला होगा ना, आणि, कुछ होगा तो वापस आती हूँ, इत्यादि इत्यादि.



त्याला काय, शंभर टक्के प्राँफीट असणार त्याला. वजन काट्या च्या खाली काहीतरी लावलेलं असणार, खरोखरच किलोभर असतोय का, डाऊट आहे; काय बिघडलं फूक्कट जास्त मागितलं तर? - हे वा असच काहीतरी, आणखीन वर!



सगळं खरं आहे, सग्गळेच बरोबर पण आहेत, आपापल्या जागी. आपल्याला स्वस्त आणि मस्त. व त्याला या स्वस्तातनंही नफा फायदा. आपण खूश, तोही खूष!



विन विन सिच्यूएशन...

---

मिलिंद काळे, 23rd May 2016

No comments:

Post a Comment