Er Rational musings #487
भन्नाट...हुबळी ते कारवार, काय रस्ता आहे यार, सूपर्र्ब. ड्रायव्हींग प्लेजर.
तट्टे इडली, रवा इडली, बोंडा सूप, चाऊ चाऊ भाथ (उप्पीट + सीरा) व काफी पोटात गेलेली होती. एक दोन एफ एम चँनेल्स कँच झाली आणि चक्क आंडू गुंडू मधन मधन ऐकत होतो. रस्त्यावर जिलेब्यांच्या पाट्या बघत होतो. मध्येच थांबून लोकांना गंतव्य स्थानाला कसं जायच ते विचारत होतो. मजा आला.
भारतात सोन्याचा धूर निघत होता हे मनोमनी पटतं जेव्हा आपण साऊथ ची देवळं व्हिजीट करतो. प्रचंड सुबत्ता असणार. एकेक मंदिर बांधायला वर्षे लागली असणार. आपलं तेव्हाचं इंजिनियरिंग बघता अचंबित होतो आपण. प्लानिंग, प्रोजेक्ट प्लानिंग अँड कंट्रोल, अर्बन प्लानिंग, सिव्हील इंजिनियरिंग, सपोर्ट बाय एम ई पी, साईट मँनेजमेंट, बजेटरी (!) कंट्रोल (!), पर्चेस - मटेरियल्स - स्टोअर्स, लाँजिस्टीक्स, टिम आँफ वर्कर्स - फोरमेन - सुपरव्हायजर्स - इंजिनियर्स - मँनेजर्स, मटेरियल सप्लायर्स, क्वालिटी कंट्रोल, आँडिट, इत्यादि अनेकविध अंगांची परफेक्ट सिनर्जी!! (उदाहरणार्थ मूर्डेश्वर मंदिर)
शोकांतिका म्हणजे आपल्यावर अनेकांनी आक्रमणे केली, आपण आपसात भांडत बसलो, आणि आपल्याच बऱ्याच जणांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले अक्षरशः नाही का? आपण जगावर राज्य करू शकत होतो यार. काय एकाहून एक संस्थानं, राजे, योध्दे, पैसा, टँलेंट, काय नाही?
असो. कमिंग बँक टू सब्जेक्ट मँटर, धीस इज अँन अमेझिंग अनुभव.
आता ठरवलय, खूप **** केली; आता वेळ काढायचा, गाडी काढायची काही न ठरवता व सूस्साट सूटायचे. नेक्स्ट इज जुलै आँगस्ट, नाऊ.
रेस्ट फाँलोज आँटोमँटिकली...
---
मिलिंद काळे, 8th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment