Tuesday, May 3, 2016

Er Rational musings #467

Er Rational musings #467



अव्यक्त भावना व्यक्त करण्याचं सोप्प, यूजर फ्रेंडली, माध्यम म्हणून फेसबूक (फब) व व्हाँट्सअँप (व्हाँअँ) कडे बघायला हवं. त्यात भरीस भर म्हणून हे (ओव्हर) स्मार्ट फोन हातात! मराठी - देवनागरी फाँट टायपिंग ची उत्तम सुविधा. आँटोमँटिकली पूर्ण शब्द स्क्रिन वर डिस्प्ले होतात, अर्धाच शब्द टाईप करता करता - फक्त योग्य तो सिलेक्ट करा! कित्ती सोप्प सहज ना? अक्षरशः करलो दुनिया मूठ्ठी में!!



प    ण...



मर्राठी प्रेमींना जर्रासा धोका?? कसा? तर असं आहे की, काही काही शब्द टाईप करायला थोडे जाचक आहेत, जसे



~ बऱ्यापैकी च्या ऐवजी बर्यापैकी

~ लोकं च्या ऐवजी लोक्स

~ पोष्टी (पोस्टस्), वेग्रे (वगैरे), सार्या (साऱ्या), बै (बाई), मांडी भोवरा (लँप टाँप), गुर्जी (गुरूजी) इत्यादि इत्यादि.



आपल्या आजच्या तल्लख चपळ तरूणाईला हे असेच शब्द खरेखूरे वाटायला लागतील बरे!! आणि तसेच जर ते लिहायला लागले, मग काय, भाषा भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही.



थोडी अतिशयोक्ती सोडा ओ, शुध्द मराठी टायपिंगची वेळ आलीये!!



आणिक ते झुक्या झुक्या काय प्रेमाने उल्लेखताय त्या महान मार्क ला? ज्याच्यामुळे आपण एव्हढे रूढावलोय त्याला? नो वे!



आपल्या उद्योगपतींना, रत्या, मुक्या, कुम्या, असं म्हणलं तर चालेल का, सहनेबल होईल का हिणवलेलं??



जावे त्याच्या वंशा...

---

मिलिंद काळे, 3rd May 2016

No comments:

Post a Comment