Er Rational musings #474
बीईएसटी, टाटा पाँवर, रिलायन्स व एमएसईबी या चार पाँवर कंपन्या मुंबई त वीज वितरण करतात. यातल्या बेस्ट मध्ये माझं करीयर सुरू झालं, 1984 साली. साधारण बारा तेरा वर्षांनी लार्सन व टूब्रो जाँईन केली. या इथे मात्र प्रचंड गोष्टी शिकायला मिळाल्या, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन प्रोसेसेस, नवीन सिस्टीम्स, खूप काही.
एल अँड टी! प्रोफेशनली मँनेज्ड इंजिनियरिंग कंपनी. दोन यंग डँनिश इंजिनियर्स भारतात, मुंबईत येतात काय, खोपट्यावजा आँफीस (!) मधून (बँलार्ड पिअर जवळ) व्यवसायाला सुरूवात काय करतात आणि या छोट्याश्या पार्टनरशिप फर्म च वटवृक्षात रूपांतर काय करतात! सिंपली अमेझिंग, माईंड बाँगलींग. Henning Holck Larsen (लार्सन साहेब) व Soren Toubro!!
टूब्रो साहेब फारच लवकरच्या काळात स्वर्गवासी झाले व लार्सन साहेबांनी स्वत: चांगले सहकारी पारखत, निवडत, एल अँड टी ला अत्युच्च स्थानावर पोहोचवले.
लार्सन साहेबांनी अनेक कित्येक कामगार स्वत: निवडलेले होते. वयाच्या नव्वदी पर्यंत लार्सन साहेब पवईत यायचे, फिरायचे, कामगारांना भेटायचे. त्यांची अर्धांगिनी सुध्दा तरूणपणातच स्वर्गवासी झालेली होती, आम्ही सगळे कर्मचारी, लार्सन साहेबांची एक्स्टेंडेड फँमिली होतो. आणि पवई वर्क्स त्यांचं दूसरं घर!
सहा सव्वा सहा फूट उंचीच्या, गोऱ्यापान इरेक्ट माणसाशी हास्तांदोलन करायला मिळणं, साहेबांना प्रेमाने आदबीने आदराने ग्रीट करणं, हे सगळं मला करायला मिळालं हा मी माझा बहुमान समजतो, अविस्मरणीय आठवणी.
2000 साली लार्सन साहेब आजारी पडले व त्यांना अत्यावस्थ अवस्थेत ब्रीच कँडी हाँस्पीटल मध्ये अँडमिट केलं. अर्थात ते बरे झाले काही दिवसांनी. त्यांच्या ब्रीच कँडी च्या स्टे मध्ये काही मोजकेच कर्मचारी त्यांच्या जवळ होते, त्यापैकी मी एक.
साहेबांना डिस्चार्ज मिळाला, तद्नंतर काही दिवसांनी एक त्यांचे पत्र व चाँकोलेट्स चा डबा आम्हा काही जणांना पवई आँफीस मध्ये साहेबांनी पाठवला! आमचे नाव व सही त्यांच्या हस्ताक्षरात, बाकी टंकलिखित, पण फाँर मी, इट्स अ ग्रेट आँनर!!
Thank you Larsen saheb. Thank you L & T...
---
मिलिंद काळे, 4th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment