Er Rational musings #519
काय डोहाळे लागलेत का? सक्काळी सक्काळीच?
इति आमच्या मायाबाई.
आज सकाळ्ळपासून जीभ (पापणी नव्हे) लवतीये, लाळ गळायचीच फक्त बाकी आहे. भूजींग ची आठवण येतीये.
छ्छ्या, एखाद तीन वर्षे झाली असतील, शेवटचं चाखलं होतं तेव्हा. अगदी वाडीत जाऊन, वसईच्या किरिस्ताव मित्रांच्या बरोबर.
कोळश्यांवर भाजलेलं, गरमागर्रम चिकन, वाफाळलेलं, पोहे (जाडे) व बटाटे यांच्यात बेमालूम मिसळवलेलं, लसूण कांदा मिरची मिश्रीत मसाला घोटवायला; आई शप्पत, ग्रेटेस्ट टेस्ट बेस्ट.
झक मारत बाकी सगळं.
एकदा, तेरा पंधरा वर्षांपूर्वी आमच्या एका काँट्रँक्टर करवी मागवलवत, लार्सन टूब्रोत काम करताना, त्याची पण आठवण होतीये. दीड किलो भूजींग (भूजणं) घेवून आम्ही तिघे जे खायला बसलोहोतो, माय गाँड! लाजवाब. आमचा साहेब तेव्हा हुडकत आलावता, कित्ती वेळ झाला - काय दारू बिरू पिताहेत का बघायला; आमच चरणं हापसणं, हादडणं बघून म्हणलेवते, चालू द्या, तुमचं चालू द्या!!
पोहेयुक्त चिकनाचा हा प्रकार माझ्या फेवरीट लिस्ट मध्ये खूप वरच्या स्थानावर आहे.
तिथे जाऊन ताजे खाण्यातच मजा आहे यार.
#वनअँडओन्ली
भू जीं ग...
---
मिलिंद काळे, 24th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment