Er Rational musings #482
देशपांडे व कुलकर्णी आढनावं म्हणजे गुजराती पटेल आडनावा प्रमाणे असावीत. देशपांडे व कुलकर्णी / कुळकर्णी सगळ्यांत आणि खूप असावेत. काळे आडनाव पण सगळ्यात आहे. जोशी तर एव्हढे काँमन आहे.
शाळेपासून आजतागायत असंख्य मित्र मैत्रिणीं ची जात विचारायची, बघायची, माहीत करून घ्यायची इच्छा ही झाली नाही कधी व गरजही पडली नाही आणि विचारलही नाही. म्हणजे कोब्रा, देब्रा, सीकेपी, लेवा पाटील, मालवणी, मराठा, सोनार इ.
काय संबंध? एकदा माणूस - व्यक्ति आवडली, सूर जुळले की ब्बास्स!
हा, आता, प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार निरनिराळे पदार्थ हापसायला मिळाले की झाल. (स्वार्थी)
लहानपणी मी सग्गळ्या मोठ्या बायकांना (म्हणजे बाबांच्या मित्राची बायको, माझ्या मित्रांची आई वगैरे तत्सम) काकू म्हणून हाक मारायचो. मला एक 'काकूमावशी'ही (!) आहे चक्क! मुलुंड पूर्वेला, फाटक काकूमावशी; बाबांच्या मित्राची बायको म्हणून काकू व आईची पूर्वाश्रमीची मैत्रिण म्हणून मावशी, व आपसूक नाव पडले 'काकूमावशी!') असो.
हल्ली मला 'काकू' कोणाला म्हणायचे व 'काकी' कोणाला संबोधायचे हा फरक कळलाय!
ब्बास, याउप्पर काही नाही, इतकेच...
---
मिलिंद काळे, 7th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment