Saturday, May 28, 2016

Er Rational musings #534

Er Rational musings #534



नीळा चुट्टूक, हिरवा शार, लाल जर्द, वा पिवळा बुंद...ऐकायला कसलं मिस मँच वाटतं ना? (नीळा शार, हिरवा जर्द व लाल चुट्टूक वगैरे, च्या ऐवजी)



त्याच काय आहे, इटस् आँल अबाऊट साँफ्टवेअर. हार्डवेअर तर जन्मत:च असतं, ते पण एक्स्पांडेबल. बेसिक काँन्फीगरेशन रेडी असतं. अँडिशनल स्पेअर स्लाँटस् मध्ये ग्राफीक कार्ड वजा अँड-आँनस् वेळोवेळी आपोआप वा प्रयत्नपूर्वक घालायचे असतात. आपल्याला एकदा प्रोग्राम केलं की झालं. मग सारखं आँनलाईन अपडेशन, मेंदू कान नाक डोळे नामक वाय फाय ओपन ठेवून जन्मभर!



पूढची पिढी मागील पिढी पेक्षा एक पाऊल पुढे असते. पर्सनल काँम्प्यूटर्स 286 मग 386 मग 486 मग पेंटीयम मग आणखीन अँडव्हान्स्ड. अँक्वंटाईन प्रोग्रेशन जणू. दोहोंतल साम्य म्हणजे भाषा (लँग्वेज).



शार, जर्द, चुट्टूक, बूंद इ सफिक्सांचा चा प्रिफीक्स फिक्स केलाय आपल्या थोरामोठ्यांनी. त्यातनं असले अपभ्रंश म्हणजे विद्रोही साहित्यच जणू!



पण, चलतय की थोडी बगल दिलेली. भाषा समृध्दच होणारे.



#प्रयोगशीलता.



आँनलाईन संक्रमण शिबीर...

---

मिलिन्न्द काळे, 29th May 2016

No comments:

Post a Comment