Er Rational musings #473
भोवरा माहितीये ना? पाण्यातला भोवरा, खेळण्यातला भोवरा व डोक्यातला भोवरा.
ह्या डोक्यावरच्या भोवऱ्याचा विशेष विचार करूया. मला कायमच वाटत आलय, की एखादी मशीनरी ची लाईन असते बघा, म्हणजे प्रोसेस फ्लो हो! म्हणजे एक मोठा कन्व्हेयर बेल्ट असतो, व ठराविक अंतरांवर काही मशीन्स असतात. एखादं प्राँडक्ट त्या बेल्ट वरून पूढे पूढे, मशीनरी च्या समोर थांबत थांबत सरकत. प्रत्येक मशीन चे काहीतरी काम असते. राँ प्राँडक्ट पूढे पूढे सरकत सरकत फिनीश्ड प्राँडक्ट होत जाते. सगळ्यात शेवटी, प्राँडक्ट ला कोणततरी मशीन त्याच्या पंजात पकडतं, वर उचलतं व अर्ध गोलाकार वळत कुठल्यातरी बाँक्स मध्ये पँक करतं.
मानव निर्मितीतली ती टाळूवरची जागा म्हणजे टाळूवरचा भोवरा. निशाण हो, परमेश्वराचे. तो मार्क आलाय कारण तिथून आपलं फिनीश्ड प्राँडक्ट वर उचलून पटकलय आपल्याला या विश्वात!
दोन भोवरे असणारी (म्हणजे परमेश्वराने री वर्क केलेली) माणसे जास्त हुश्शार असतात असं म्हणतात...
---
मिलिंद काळे, 4th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment