Er Rational musings #501
~ "या संदर्भामध्ये. या संदर्भाची."
मंत्री उवाच.
कोणत्याही मंत्र्याची वा पाँलिटिकल लीडर ची मुलाखत बघा, हा 'संदर्भ' हा शब्द प्रत्येक तीन वाक्यांत एकदा तर असणारच.
संदर्भासहित स्पष्टिकरण द्यावं लागत बुवा!!
~ "पूट अप करा. पूट अप केलय."
सरकारी वाक्य.
Please put up the proposal or the proposal is put up (for approval).
या इंग्लिश वाक्यांना समानार्थी (!) सरकार दरबारी मराठी.
"पूट अप" कसलं करताय, पटापट करा कायते!!
~ "मैलाचा दगड पार केला, माईलस्टोन इज रिच्ड."
एखाद्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा! पण किलोमीटरचा दगड नव्हे हाँ, नाहीतर समजाल
एक पूर्णांक सहा शून्य नऊ तीन चार चार किलोमीटर चा दगड!!
1 mile = 1.609344 Kms
~ पाचशे हून अंधिक अवांतर सवांतर इतर स्फूटे लिखाणकाम म्हणजे खरोखरच मैलाचा दगड पार केल्यासारखं वाटतय.
या संदर्भामध्ये सगळ्या घटनेची पूर्ण माहिती घ्यायला मी सागितली आहे. या संदर्भाविषयी संबंधित कार्यवाही सुचविणारा अहवाल पूट अप केला जाईल. या संदर्भाने, हा पूट अप केलेला अहवाल व कारवाई, एक मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल.
#मिलिंदमोरेश्वरकाळे...
---
मिलिंद काळे, 15th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment