Er Rational musings #476
हाँलिवूड वरून पहिले आलं बाँलिवूड (हिंदी फिल्म इंडस्ट्री, बाँम्बे वरून)
मग लाईनच लागली.
आँब्सेशन तर बघा "वूड" च...
~ टाँलिवूड (तेलगू फिल्म इंडस्ट्री)
~ काँलिवूड (तामिळ फिल्म इंडस्ट्री - केरळ नव्हे; तर चेन्नईतल्या कोदांबकम गावामुळे - हे हब आहे तमिळ चित्रपटांचे)
~ माँलीवूड (केरळी फिल्म इंडस्ट्री, मल्याळम् मुळे व मराठी फिल्म इंडस्ट्री सुध्दा, मराठी मूळे)
~ पाँलीवूड (पंजाबी फिल्म इंडस्ट्री) बापरे!
~ गाँलीवूड (गुजराती फिल्म इंडस्ट्री) बापरे!
~ आँलीवूड (ओरीया फिल्म इंडस्ट्री) बापरे!
अँड होल्ड यूवर ब्रेद,
~ सँडलवूड (कर्नाटक फिल्म इंडस्ट्री)!!
काँकटेल वरून माँकटेल सर्रास रूढावलय.
पण आता नवीन एन्ट्र्या आहेत ना.
SUV (स्पोर्ट्स यूटिलिटी वेहिकल) वरून LUV (लाईफ यूटिलिटी वेहिकल!), MUV (मल्टी यूटिलिटी वेहिकल!), MPV (मल्टी प्रिमियम वेहिकल!!) काहीही!
आता महिंद्रा व महिंद्रा ने तर XUV, TUV अशा ब्रँड नावाने गाड्या आणल्यात!!
MRP (मँक्झीमम रिटेल प्राईज) वरून LRP (लाँजिकल व रिझनेबल प्राईज!). आता कोणाचं लाँजिक व कोणाचं रिझन हे विचारू नका!!)
वाहत्या गंगेत हात धूवून घ्यायला सगळेच तय्यार...
---
मिलिंद काळे, 5th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment