Er Rational musings #500
फाफडा़ जलेबी उर्फ पापडी जिलेबी या काँबिनेशनचा उगम मुलुंड पश्चिम मध्ये झाला आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
लांब चकती सदृश राऊंडेड हाँलो फाफड़ा, लांबी सहा इंच ते एखाद फूट. विथ; कानडी मूळाक्षरे सदृश ग्गोड पाकात लडबडलेली पात्तळ सोनेरी पिवळी जिलेबी, डायमिटर तीन साडेतीन इंच.
पापडी, ढोकळा, पपई यांचा रेसिड्यूअल चुरा सदृश प्पिवळी चुरचुरीत चटणी.
ग्रेट काँबिनेशन!
वन आँफ द सर्वोत्तम क्विक फायर, सुटसुटीत, चविष्ट, फेवरीट नाष्ता !!
(सोडा लेमन मिक्स हे सुध्दा वन आँफ द सर्वोत्तम लिक्विड फेवरीट काँबो आहे. असो.)
या, वाट बघतोय...
----
मिलिंद काळे, 15th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment