Er Rational musings #491
माझा मुलगा व मी.
एक सू संवाद
तो: बाबा, तू मुंबई पूणे एक्स्प्रेस वे ला गाडी चालवताना सेंटर लेन ला का चालवतोस? ओव्हरटेक करतोस व परत सेंटर लेन ला येतोस.
मी: अरे, हीच खरी पध्दत आहे. राईट लेन मोकळी ठेवायची शक्यतो ओव्हरटेकिंग करणाऱ्यांसाठी; वा अति अतीच जलद वाहनांसाठी.
तो: बाबा, मग हे काही जणं साठ पासठ च्या स्पीड ने राईट लेन ने का चालवतात? कंटिन्यूअसली?
मी: अरे, एकतर ती प्रायव्हेट टँक्सी असेल वा टूरीस्ट वेहिकल असेल; ती लोक बहुतेक वेळा माठ असतात, पण सगळेच नाही हं.
तो: बाबा, बघ बघ, ती अल्टो, ती पजेरो, ती व्हेटो, ती ही, ती ती, पण अशीच संथ जातीये राईट लेनने, व त्या प्रायव्हेट गाड्या आहेत.
मी: अरे, काही जणांची अक्कल गुडध्यात असते रे. काही जणांना डावी कडून, मधनं जायला लाज वाटते. काही जणांना वाटत की राईट हँड ड्राईव्ह असतं ना अमेरीकेत वगैरे तसं आपल्या रस्त्यांवर पण जायच असतं. काही लोक चक्क येड** असतात.
तो: बाबा, तू प्रत्येक बोगद्यात हेड लाईट्स, पार्कींग लाईट का लावतो? बाहेर पडला की बंद करतोस. बर्रेच जणं लावतच नाहीत. बहुतेक ट्रक्स चे टेल लाईटस् पण बंद असतात.
मी: अरे, आपण काळजी घ्यायची असते, आपल्या पाठच्याची; इतरांना कळलं पाहीजे, दिसली पाहीजे आपली गाडी. खूप जण कंटाळा पण करतात किंवा तो सेन्सच नसतो रे.
तो: बाबा, कायमच, दिवसाच्या कोणत्याही वेळी, लोणावळा ते ऊर्से टोल प्लाझा, दूचाकी स्वार कसे काय फिरतात? ते ही विदाऊट हेल्मेट, कधीतर तीघे तीघे एका बाईकवर. पोलिस पकडत नाहीत का?
मी: अरे, ते वाहतूक पोलिसांचं काम आहे का गस्ती पथकाचं का आणि कोणाचं, हा प्रश्न असावा. पोलिसांना खूप काम असतं रे. ओव्हर स्पीडींग करणाऱ्यांना स्पीड गन ने पकडायचं. हेव्ही वेहिकल्स नां कोपऱ्यात थांबवून त्यांचे पेपर्स वगैरे तपासायचे. त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचे, म्हणजे त्यांना 'फाईन' करायचा रे. लाईट कमर्शियल वेहिकल्स च्या ड्रायव्हर क्लिनर शी हातमिळवणी करायची म्हणजे हास्तांदोलन रे. विदाऊट हेल्मेट, विदाऊट सीट बेल्ट वाली साँफ्ट टार्गेट पकडायची. एकाची नजर कमी पडते म्हणून की काय, तीन चार जणांनी घोळक्याने सिग्नल च्या पूढे कुठेतरी लपून गुन्हेगार पकडायचे वगैरे, एक ना चार कामे.
तो: बाबा, कुठल्याही चढ रस्त्यावर, दोन ट्रक पँरलल कूर्मगतीने चाललेले का दिसतात?
मी: अरे, काय आहे, ते दोन ट्रक एकापाठी दूसरा असेच असतात चढताना. एका विशिष्ट वेळी, बहुतकरून अगदी वर असताना, लास्टला, पूढचा आचके खायला लागतो व अल्मोस्ट झिरो स्पीड ला येतो. मग पाठचा पण ब्रेक मारून कंट्रोल करण्या ऐवजी उजवी कडे मूंडी काढतो, व कसबसा पूढे जायचा यत्न करतो. पण होतं काय, तोही हतबल होतो, गटांगळ्या खायला लागतो व दोघेही जोडीने चढ एकदाचा सर करतात रे.
तो: बाबा, मग पाठच्या व इतर लहान गाड्यांचे काय?
मी: अरे, लहान गाड्यांनी चडफडत उध्दार करत भजन करत सहन करायचं नऊ अकरा मिन्टं व नंतर परत सूसाट सूटायचं बघायचं रे.
तेव्हढ्यात अचानक रस्त्यात खड्डे सुरू झाले, अन-ईव्हन अचानक विचकत स्पीड ब्रेकर्स लागायला लागले.
मी: स्वगत; च्या** मूंबईत शिरलो वाटतं...
---
मिलिंद काळे, 11th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment