Er Rational musings #481
कुठला हा रस्ता? सर्विस रोड सुध्दा दिसतोय. छानसी दूतर्फा झाडं. प्लेन. उगीचच स्पीड ब्रेकर च्या वेष्टनातले उंच खोबडधोबड उंचवटे वरवंटे नाहीत.
परदेशातला नाहीये, परराज्यातला आहे. निपाणी आँनवर्डस् बेळगावी पर्यंत व फूढे पण.
ड्रायव्हींग चे सूख. थोडं मंचिंग. मध्ये पोहे, उप्पीट व चहा. टोल नाक्यांना काकडी. आणि हो एफ एम 91.9 रेडियो नशा - फिर वही दीवानगी, साग्रसंगीत साथीला. (फक्त, बहुतांश वेळ. रेंज नूसार, फक्त गाणी, नो बीचमें बकबक पकपक त्या जाँकी ची.)
मूक्काम पोस्ट बेळगावी. नेहरू नगर एरिया. खाऊ गल्ली (शोधकार्य अर्थातच). पाणी पूरी, भेळ, समोसा, वडा पाव, मसाला काँर्न, चिकनची भजी, व फालूदा.
फिरण्या व खाण्या साठी जन्म आपूला...
---
मिलिंद काळे, 6th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment