Friday, May 13, 2016

Er Rational musings #498

Er Rational musings #498



खोदा-ए-नूर टिकून आहे. माझा जूना छ्छोट्टासा ईराणी. लंडन पिल्सनर, आर्लेम या एकदमच फेडेड अक्षरांबरोबर कार्ल्सबर्ग ची तशी नवीनच रंगवलेली पाटी दिसली. आत डोकावलो, रहावेनाच. तोच तो जूना मालक व तोच तो जूना वेटर. एकेकटेच पण. एका लिस्टलेस रिकाम्या टेबलावरचा पंखा असाच एक दोन च्या स्पीड मधे लिस्टलेसली गरगरत होता. जूनी नवी बियरची खोकीच खोकी सभोवताली, भिंतीला लागून. जूनाट, ब्लर झालेला आरसा, कोपऱ्यातली अनयूज्ड वाँश बेसीन, काऊंटरवरच्या चौकोनी बरण्या, आतला वरच्या भागात जाणारा लाकडी जिना, फिक्कट निळ्या लाल पिवळ्या, एकावर एक रचलेल्या प्लँस्टिकच्या गोल चौकोनी प्लेटा, अजूनही थोड्याश्या ताठ मानेनं उभं राहिलेल्या गोल लाकडी खूर्च्या, व नवीच दिसणारी मांजराची दोन पिल्लं !! शेपटी ताठ करून, माझ्या पायांशी घुटमळणारी, अंग घासत, बारीक म्मिआँव करत इकडून तिकडे येरझाऱ्या घालणारी जोडगोळी.



दोन परस्परविरूध्द गोष्टींवर अपरंपार सारखेच प्रेम करणारा मी. एक स्वखूषीने त्याज्यल्या मुळे, आँर्डर ठोकली त्यातल्या दूसऱ्या गोष्टीची. एक पानी कम व बन मस्का. साधारण वीसेक मिनिटे, तीन (च) पानी कम, व मी बाहेर.



चार फूकट गोष्टी रुबाबात मागवल्यानंतरची ही पाचवी (पेड) आँर्डर असायची माझी. ऐशी नव्वद च्या दशकांत.



"पानी, पंखा, पेपर, माचीस"

नंतर एक "पानी कम" चाय!



मग पंख्याखाली टेबलावर बसून, पाणी पिऊन झाल्यावर, माचीस ने विल्स नेव्हीकट शिलगवायची, पेपर उघडायचा, डोकं खूपसायचं इंग्लीश क्राँसवर्ड् मध्ये, व पानी कम चहा ढोसायचे.



मेमरीज आँफ मोमेंट्स आँफ ग्रेट हँप्पीनेस, जाँय, पीस अँड इंटलेक्च्यूअलन्स (!!)...

---

मिलिंद काळे, 13th May 2016

No comments:

Post a Comment