Saturday, May 14, 2016

Er Rational musings #499

Er Rational musings #499



मामवाने चंद्रावर गेले पाहीजे. मंगळावर वा अन्य ग्रहांवर याने पाठविली पाहीजेत. सूपर साँनिक जेट्स बनविली पाहीजेत. उपग्रह सोडले पाहीजेत.



काहीच आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. पण त्याचबरोबरीने जर अँबंडंटली ईझीली अँव्हेलेबल गोष्टींवर लक्ष जास्त केंद्रित केल, मूलभूत विदन्यान संशोधनाला महत्व व प्राधान्य दिलं आणि खाली मांडलेल्या अशक्यप्राय आव्हानं सर केली, तीही सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत अँव्हेलेबल केली तर?



~ आज गरज आहे ती कृत्रिम पावसाच्या टेक्नीक ची...

हवेतील आर्द्रता व इतर वायू यांचा उपयोग करून, पाऊस कुठेही पाडता आला पाहीजे.

~ आज गरज आहे ती सोप्या पध्दतीने वीज जनरेट करण्याची..

1) यासाठी, वातावरणातील निरनिराळे वायू, इंधन म्हणून नँचरली वापरून वीज निर्माण करण्याची.

2) माणसं चालताना किंवा व्यायाम करताना (धावण्याचा वा सायकलींग करताना) निर्माण होणारा दाब (प्रेशर / डिस्प्लेसमेंट) याचा वापर करून वीज निर्माण करण्याची.

3) आपल्या डोळ्यांची उघडझाप होत असते, पापण्यांची हालचाल होत असते, आपण श्वासोश्वास करताना हवा आत घेऊन आँक्सीजन आत शोषून कार्बन डाय आँक्साईड चे प्रामुख्याने उत्सर्जन करत असतो...

या सर्व प्रकारांतून काही सूक्ष्म स्पंदनं निर्माण होत असतात, लहरी उत्पन्न होत असतात. या सूक्ष्म कंपनांचा वापर करून वीज निर्माण करता येईल?!

~ आज गरज आहे ती एका एनर्जी पील ची, पूर्ण अन्नाला 'लोकम' म्हणून या फूड पिल चा वापर करता आला पाहीजे...

मानवी शरीराला जगण्यासाठी म्हणून जेव्हढ्या कँलरीज दररोज लागतात मिनिमम, तेव्हढ्या कँलरीज या छोट्याश्या गोळीतनं मिळाल्या पाहीजेत.

~ आज गरज आहे ती समुद्री पाण्यापासून पिण्या योग्य पाणी बनवण्याची...

पृथ्वी वर दोन त्रृतीयांश भाग व्यापलाय या समूद्राने! मुबलक पाणी अँव्हेलेबल आहे फक्त प्रक्रिया माहीत नाहीये.

~ आज गरज आहे ती एखादी सात मजली इमारत सात दिवसांत उभी करण्याची. ती सुध्दा भूकंप विरोधी...

प्रि फँब्रिकेटेड स्ट्रक्चर, व एकावर एक फिक्सींगची सुविधा वापरून अँक्च्यूअल बिल्डींग आठवड्याभरात उभी राहीली पाहीजे.

~ आज गरज आहे ती एक चमचाभर पाणी मिश्रित पीक रसायनाची...

ह्हे एव्हढे पाणी द्या, वा ठिबक सिंचन करा; बी बियाणं रसायनं वापरा, व शेती घ्या. दररोज एक(च) चमचाभर रसायनात काम झालं पाहीजे.

~ आज गरज आहे ती वातावरणातील वायूलहरी, साऊंडवेव्हज वापरण्याची, मोबाईल फोन, म्हणजे डेटा व व्हाँईस साठी नव्हे तर वीज ट्रान्सफर साठी. केबल्स खणून टाकायला नको वा पोल्स वरून तारा ओढायला नकोत...

प्रत्येक सोसायटीवर, वा इंडिव्हीज्युअल घराबाहेर बाल्कनीत वगैरे एक रडार सदृश डिश अँटेना बसवायची व अव्याहत वीज पूरवठा रिसीव्ह करायचा. वीज परावर्तित करणारी रडार सदृश डिश अँटेना ही पाँवर कंपन्यांनी त्यांच्या सब स्टेशन्सवर बसवायची.



कदाचित अनेक वर्षे लागतील, कठीण आहेत ही ड्रास्टीक इनोव्हेशन्स, पण अशक्य नक्कीच नाहीत ना?



जर प्रत्यक्षात उतरल्या या स्वप्नरंजनी कल्पना, तर...

---

मिलिंद काळे, 14th May 2016

No comments:

Post a Comment