Er Rational musings #540
लय, ताल, सूर, ठेका...
रेल्वे स्टेशन वरील बूट पाँलिश वाला, पाँलिश करताना एव्हढा एकाग्र तल्लीन झालेला असतो माहितीये? उजव्या हाताने ब्रशने पाँलिश करताना, त्याचा डावा हात, (इक्वल आँपोझीट) दिशेने एका लयीत हलत असतो.
पिठाच्या गिरणीत धान्य दळायला घेवून गेलं की तो दळण दळणारा एव्हढा एकाग्र तल्लीन झालेला असतो माहितीये? पीठ दळत असताना, ठरावीक विशिष्ट कालांतराने, एका तालाने, एक दगड घेऊन, कटर्र कटकट, कटर्र कटकट, असा वर खाली आत बाहेर करत फिरवत असतो.
संध्याकाळी गच्च गर्दीने भरलेल्या मार्केट मधला भाजी विक्रेता असो वा दारोदार फिरून भंगार वस्तू विकत घेणारा भंगारवाला असो,
एव्हढे एकाग्र तल्लीन झालेले असतात माहितीये? एकाच सूरात, अव्याहतपणे सूरावत असतात "एक किलो तीस, एक किलो तीस sss" वा "ए डब्बा बाटलीवाला, ए डबा बाटलीवाला sss".
लोकल ट्रेन मधे काही ना बाही गाणी म्हणून पैसे मिळवत मागत फिरणारा अंध गायक एव्हढा एकाग्र तल्लीन झालेला असतो माहितीये? त्याच्या हातात असते ती एक साधारण दोन इंच बाय दोन इंचाची चौकोनी अँस्बेस्टाँस च्या कपच्यांची जोडी, जी ज्या काही शिताफीने तो वाजवतो, ठेका धरतो, तो निव्वळ लाजवाब. शिरडी वाले ss साईबाबा ss, कटारकट ss,, आया हूँ तेरे ss दरपे सवारी ss, कटारकट...
अत्तिशय सामान्यातल्या सामान्य माणसांची ही उदाहरणं. सेपरेट नव्हे, तर परफेक्ट काँबिनेशन आँफ लय, ताल, सूर, ठेका हा वरील प्रत्येकांत अंगीभूत समाविष्ट आहेच.
कस्पटासमान, बचकांड, (सपोजेडली) खालच्या दर्जाचा धंदा व्यवसाय करणारे, नगण्य असलेले, निराश, हताश, हतबल, व अगतिक झालेले लोक्स सुघ्दा जीवनातला ठेका, सूर, ताल व लय सोडत नाहीत !!
नाहीतर आपण...
---
Milinnd Kale, 1st May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment