Er Rational musings #587
० सेकंदात लाईक करा आज दिवसभरात आनंदाची बातमी मिळेल..
दूपारी ही पोस्ट आली माझ्या टाईमलाईन वर. हल्ली जरा अशा पोस्टी बंद कमी झाल्यातना. उदाहरणार्थ 7 जणांना पाठवा, सोन्याचं लुगडं मिळेल; 4 ग्रूप्स ना पाठवा, यूरेनियम ची बुगडी मिळेल; 9 ग्रूप्स ना पाठवा, चमत्कार बघा...एटसेटरा.
मी, लाईक केलं, पण शून्य सेकंदात कसकाय पाँसिबल हाए? तीन सहा सेकंदांनी (उरलेल्या) दिवस भरातली चांगली बातमी हुकली म्हणायची. अरेरे...
पूढच्या वेळेला, ह्या असल्या तसल्या पोस्टस् शेअर करताना व माझ्या भिंतीवर टाकताना, थोडा (ह्यूमनली पाँसिबल) अवधी द्यावा ही कळकळीची विनंती.
चांगली बातमी मिळाली की लगेच च कळवतो.
लोभ आहेच, तो वृध्दींगत व्हावा ही नम्र विनंती...
----
Milinnd Kale, 23rd June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment