Er Rational musings #558
मुले म्हणजे देवाघरची फूले. आई वडिलांचा प्राणच जणू. म्हातारपणची काठी वगैरे ठीकाय, पण खऱ्या अर्थाने निर्भेळ 'कौटुंबिक' आनंद.
'हम दो हमारे दो' हे जनरली चित्र दिसतं. मग ती दोन्ही मुले असोत, वा एक मुलगा एक मुलगी! वंशाला दिवा(!) म्हणून दोन तीन मुलींच्या नंतर 'चान्स' घेवून तिसरा वा चौथा मुलगा झालेली, असलेली जोडपीही आपण बघतो.
पण, पण, जोडपं दोघेही नोकरी करणारे असतील, व एकत्र कुटुंब पध्दत नसेल - घरी कोणी वडिलधारी व्यक्ती नसेल, तर, तर मात्र शक्यतो अस दिसत नाही. दोहो नोकरदारांना, तस दोघांना वाढवणं, प्रँक्टिकली कठीण जातं. नवीन फ्लँट वगैरे घेतला असेल, तर मग, एकाचा पगार गृह कर्जाचे हप्ते व दूसऱ्याचा पगार उर्वरित घरखर्च, अशीही अँरेंजमेट असू शकते. पाळणाघरं, घरकामाच्या - स्वयंपाकाच्या - धुण्याभांड्याच्या बाया, मावश्या व सर्वांची तंत्र व मेळ सांभाळण जिकरीचे असते. स्वेच्छा म्हणा वा नाईलाज, मनाला मुरड घालावी लागते, घातली जाते.
निर्विवादपणे, हा अत्यंत पर्सनल डिसीजन असतो, असावाच. दूमत नाहीच नाही.
'सिंगल' मुला-मुली वर जबरदस्त मेहनत घेतलेली दिसते. जनरली, अशा एकुलत्या एक मुला मुलीचा ईक्यू (ईमोशनल कोशंट) प्रचंड हाय असतो. ममाज बाँय, वा पपाज गर्ल, ला शोभेशी असतात ती.
एकुलती एक असो वा दोन वा तीन वा चार, इट्स लाईक पासींग आँन द बँटन. निसर्गॠतूचक्र.
'जीन्स'/'डीएनए'-टिकली स्पिकींग...
---
Milinnd Kale, 9th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment