Tuesday, June 7, 2016

Er Rational musings #553

Er Rational musings #553



बाल्यावस्थेपासूनची व्यावसायिक पार्टनरशिप टिकणं हे महा कर्मकठीण व ती टिकवणं हे महा जटील काम आहे. दोन प्रगल्भ व अनुभवी व्यक्ति, आपापली बलस्थानं ओळखून, आपापले कच्चे दूवे हेरून जेव्हा पार्टनरशिप करतात ती असते प्रौढावस्थेतली पार्टनरशिप, अ विन विन सिच्यूएशन!



दोन तरूण, उत्साही, धडपडे व प्रचंड ईच्छाशक्ती असलेले, एकत्र येतात खरं. काही काळ सुखाने 'संसार'ही करतात, पण...इन्व्हेरियेबली सुरू होतं, तू तू मैं मैं, तुझं तू माझं मी, व तुझ्यामुळे तसं तर माझ्यामुळे असं!



अनुभवाने दोघेही शिकतच असतात, मोठे होत असतात, पैसे - नाव कमावत असतात. मग, आवडो, पटो, नावडो ना पटो, तो क्षण येतोच. धुमसत असलेली कारणे उरफाट्या शब्दांवाटे बाहेर पडतात, टोचतात, टोकत रहातात. समजूतदारपणाला, तिरस्कार व द्वेष, बाहेरचा रस्ता दाखवतो. इगो, बाकी सगळ्याला 'गो' करतो. शिल्लक राहते ती टोचणी.



आणि एक जखम.



सन्माननीय अपवाद आहेत, असतातच.



पुलाखालून बर्रेच पाणी वाहून गेल्यावर, अशक्य उशीर झालेला अस्तो.



वेल, जनरली...

---

Milinnd Kale, 7th June 2016

No comments:

Post a Comment