Er Rational musings #593
आज चव बघीतली नाहीये. अरे आज चतुर्थी ना? मी आपलं नुसतंच 'हं' केलं; मनातल्या मनात म्हणलं खरच की, आमच्या मायाबाईंचा (अस्मादीकांच्या अहो) आज उपास, कस काय विसरलो बाबा?
चाखून बघीतल मी, मग तुटूनच पडलो, काय चवीष्ट बनवलवत!
परवा एका मित्राकडे जेवायला गेलोतो. "शह्याण्णव कुळी" कोकणस्थ ब्राह्मण हा. बरं, संकष्टी चतुर्थी एकादशी आषाढी, दसरा असो वा दिवाळी, ह्याची चंगळ; चांगल्या अशा या शुभ दिवशी सणासुदीला पठ्या हमखास हट्टाने आवर्जून नाँन व्हेज घरी तरी आणून खाणार वा बाहेर जाऊन तरी हापसणार. वर मुक्ताफळे सुरूच. म्हणणार की शुभदिनी आवडत्या गोष्टी केल्या की प्रचंड पूण्य लागतं; पटलं! मग आम्ही सामिष चापायला मोकळे! बरं, बाहेर असलं खायला गर्दी पण कमी असते ना?!
आमच्या अहो व माझ्या बऱ्याच मित्रांच्या अर्धांगिनी स्वत: पूर्ण शाकाहारी आहेत. आयुष्यात नाँन व्हेज टेस्ट पण नाही केलय यांन्नी. परंतु चिकन व फिश असले बनवतात की जन्मजात मांसाहारी असणारे, खाणारे, बनवणारे झक् मारतील.
कसं काय जमत बाबा, हे एक गूढच आहे. ह्या सगळ्या सुगरणींना वरदान असाव असे मला राहून राहून वाटते. तुम्ही बनवत रहा, खिलवत जा, आम्ही खवय्ये आहोतच मनापासून दाद द्यायला.
या सर्व अहोंना सलाम...
---
Milinnd Kale, 27th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment