Wednesday, June 15, 2016

Er Rational musings #570

Er Rational musings #570



काही गोष्टी एव्हढ्या फिट्ट बसल्यात डोसक्यात, काही लोकांच्या, की काही सांगायची सोय नाही.



कित्ती मेला कावळा ओरडतोय, व कधीपास्नं. खिडकीत बसून. आज पाहूणे येणार बहुतेक. इति शेजारच्या कोंजरकर काकू.



कित्ती प्रयत्न केला रे मिलिंन्द. पण मेली आडवी गेलीच. मांजर आडव गेलं, आता काहीतरी अघटीत व अभद्र घडणार. (आता ते मांजरच होतं का बोका? डावी कडून उजवीकडे गेलं का उजवी कडून डावीकडे? यातलं चांगल काय वाईट काय? हम्म्म, हे मी नाही विचारल)



शिटलाच. चला, आज धनप्राप्ती दिसतीये नशीबात. कुठली पाठची देणी बिणी वसूल होणार, व्वा! कावळा, नेमका डोक्यावर हागला ओ. इति नाईक काका.



घर असं पाहीजे, की मुख्य दरवाज्यातनं बाहेर पडताना, आपल्या बरोब्बर समोरची दिशा दक्षिण नकोच नको. इतर कुठल्याही दिशेला चालेल.



आँफीस मधली आपली खूर्ची अशी पाहीजे की आपण बसल्यावर, आपलं तोंड उत्तर दिशेलाच, किंवा पूर्व दिशेलाच, पाहीजे. बाकी कुठेही नको.



झोपल्यावर पाय दक्षिणेला नकोत. दक्षिण दिशेला डोकं करून झोपले तर चालेल.



"आज शनिवार; केस कापू नयेत शनिवारी" ते अगदी "पहिले उजवा पाय पूढे टाकावा बाहेर पडताना", इथपासून ते "दिन आकड्याची गोळाबेरीज करावी, सिंगल डिजीट पर्यंत. तो आकडा शुभ असावा" पर्यंत! इत्यादि.



अनुभव येतच असतात, जग पूढे सरकतच असते. चांगल्या वाईट अनुभूतींचा संबंध वरील गोष्टींशी हमखास व कायमच प्रत्येकवेळी असतोच असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. नाही का?



मला, आपल्याला जे चांगलं वाईट, ते च दूसऱ्याला वाईट चांगलं असू शकतं ना?



सार सगळच सरतेशेवटी सर्वश्रेष्ठ स्वानुभव सापेक्ष...

---

Milinnd Kale, 15th June 2016

No comments:

Post a Comment